05996
राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांची
पाट हायस्कूलमध्ये धामधूम
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. २२ ः पाट हायस्कूलमध्ये राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आणि जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने प्रशालेतर्फे जोरदार तयारी सुरू आहे. २८,२९ व ३० नोव्हेंबर या कालावधीत या स्पर्धा होणार आहेत.
एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी, पाट संचलित एस. एल. देसाई विद्यालय पाट व (कै.) सीताबाई रामचंद्र पाटील कनिष्ठ महाविद्यालय तसेच (कै.) डॉ. विलासराव देसाई कला वाणिज्य व विज्ञान उच्च महाविद्यालयात इंग्लिश मीडियम स्कूलचा नामकरण सोहळा व प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षकांच्या गौरव समारंभाचे औचित्य साधून २८,२९ व ३० नोव्हेंबर या कालावधीत राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा व जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने शाळेच्या मैदानावर माती टाकून पूर्वतयारीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसह शालेय कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहे. स्पर्धा सुरळीत पार पडावी, यासाठी संस्था पदाधिकाऱ्यांकडून योग्य नियोजन केले जात आहे. त्यामुळे या स्पर्धेची उत्सुकता विद्यार्थी, ग्रामस्थ व सर्व क्रीडाप्रेमींना लागून राहिली आहे.