05990
वेंगुर्ले ः येथे गेट-टुगेदरसाठी उपस्थित असलेले वर्गमित्र.
वर्गमित्रांनी अनुभवला आठवणींचा प्रवास
वेंगुर्लेतील स्नेहमेळावा; बांदा खेमराजच्या माजी विद्यार्थ्यांची भेट
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २२ ः येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूलच्या एसएससी १९९० च्या बॅचचे दोन दिवसीय चौथे गेट-टुगेदर वेंगुर्ले किनारी वसलेल्या ‘सॅम अॅण्ड सन’ या रिसॉर्टमध्ये उत्साहात झाले. तब्बल ३६ वर्षांनंतर पुन्हा एकत्र भेटलेल्या वर्गमित्रांनी आनंदमयी आठवणींनी भरलेला अविस्मरणीय प्रवास अनुभवला. सलग चार वर्षे निरनिराळ्या ठिकाणी हा उपक्रम राबविला असून यंदाचा गेट-टुगेदर विशेष ठरला.
यंदा वयाचा पन्नाशीचा टप्पा पूर्ण केल्याचे औचित्य साधत जीन्स व टी-शर्ट असा ड्रेस कोड ठेवला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवंगत वर्गमित्रांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, फनी गेम्स तसेच जुन्या आठवणींचा जल्लोष सुरू झाला. वर्गमित्रांच्या मैत्रीची आठवण कायम राहावी म्हणून स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
रात्री उशिरापर्यंत फटाक्यांची आतषबाजी, स्वादिष्ट मेनूचा आस्वाद आणि मैत्रीच्या गप्पा अशा जल्लोषमय वातावरणात मजा लुटण्यात आली. एकूण ३२ वर्गमित्रांनी गेट-टुगेदरचा आनंद घेतला. आतषबाजीसाठी परेश नाटेकर, स्मृतिचिन्हासाठी संजय शिरोडकर, तर टी-शर्टसाठी सुनील नाईक यांनी योगदान दिले. या गेट-टुगेदरला राकेश वाळके यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास राकेश वाळके, संजय शिरोडकर, योगेश काणेकर, सूरज राऊत, सुनील नाईक, परेश नाटेकर, उदय बेहेरे, नाना वझरकर, उमेश वैद्य, गुरुनाथ सावंत, विवेक जोशी, काका कारेकर, मंगलदास साळगावकर, नंदू गोवेकर, नारायण आकेरकर, सुनील कुबडे, नरेंद्र कुबल, शाम येडवे, ज्योती पावसकर, मनिषा भोसले, सचला आरोलकर, मेधा कल्याणकर, स्वाती गोवेकर, सुचिता गोवेकर, उज्ज्वला सावंत, शीतल कासकर, मनिषा सावंत, माया महाजन, मृणाल महाजन, रेश्मा व इतर वर्गमित्र उपस्थित होते.