कोकण

धावणे स्पर्धेमध्ये झियाद शेख प्रथम

CD

धावणे स्पर्धेमध्ये
झियाद शेख प्रथम
सावंतवाडी ः स्पोर्टस् फाउंडेशन सिंधुदुर्गद्वारे आयोजित एक किलोमीटर रनिंग क्रीडा प्रकारात बारा वर्षांखालील वयोगट मुले यामध्ये सिं.जि.शि.प्र. मंडळ संचलित मदर क्विन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडीचा विद्यार्थी झियाद शेख याने प्रथम क्रमांक पटकावला. या यशाबद्दल त्याला प्रशस्तीपत्र, मेडल व चषक देऊन गौरविण्यात आले. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष खेमसावंत भोसले, चेअरमन शुभदादेवी भोसले, कार्यकारी विश्वस्त लखमराजे भोसले, विश्वस्त श्रद्धाराजे भोसले व मंडळाचे संचालक दिलीप देसाई, सहाय्यक संचालक अ‍ॅड. शामराव सावंत, सदस्य जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, मुख्याध्यापिका अनुजा साळगावकर यांनी अभिनंदन केले.
..........................
भात खरेदी नोंदणीचे
शेतकऱ्यांना आवाहन
सावंतवाडी ः यंदाच्या हंगामात तब्बल सात महिने पाऊस सुरू असल्याने भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत, शासनाने शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत हमीभावाने भातपीक खरेदी करण्याची योजना सुरू केली आहे. त्यानुसार, आता सावंतवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना भात खरेदीसाठी रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन केले आहे. सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे यांनी तालुक्यातील भातपीक हमीभावाने विकू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी त्वरित संघाच्या सावंतवाडी कार्यालयात रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन केले आहे. खरीप हंगाम २०२५-२६ साठी भात खरेदीची नोंदणी (रजिस्ट्रेशन) सुरब झाली आहे. यासाठी २०२५-२६ चा भात पिकपेरा नोंदीचा सातबारा, आधारकार्ड झेरॉक्स, चालू व्यवहार असलेल्या पासबुकची झेरॉक्स, आधार लिंक असलेला मोबाईल आणावा. शेतकऱ्यांनी कागदपत्रांसह सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयात नोंदणीचे आवाहन केले आहे.
..........................
पाडलोस माऊलीचा
बुधवारी जत्रोत्सव
सावंतवाडी ः पाडलोस ग्रामदैवत श्री देव रवळनाथ माऊली पंचायतनाचा वार्षिक जत्रोत्सव बुधवारी (ता. २६) होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तांसाठी दिवसभर विविध धार्मिक विधी व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. जत्रोत्सवानिमित्त सकाळी देवतांवर महाअभिषेक, समाराधना, ओटी भरणे, केळी ठेवणे तसेच नवस बोलणे-फेडणे या धार्मिक सेवांचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री श्रींची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. रात्री एकला आजगावकर दशावतार नाट्यमंडळचा पौराणिक नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Cylinder Shortage : हॉटेल व्यावसायिक गॅसवर! व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा मर्यादीत, पाइपलाइन गॅसचा ८० टक्केच वापर करण्याची सूचना

Porsche Car Accident : पोर्शे कार अपघात प्रकरणातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालला जामीन मंजूर

Latest Marathi News Update : राज्यासह देशात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Disabled Scheme: तब्बल ३० वर्षांनंतर मोठा बदल! महायुती सरकारने दिव्यांगांसाठी आर्थिक मदत ₹१५,००० पर्यंत वाढवली; अर्ज कसा करायचा?

Women Employees: महिला कर्मचाऱ्यांसाठी गेम-चेंजर निर्णय! ‘लवकर या-लवकर जा’ योजना जाहीर; लाभ कसा घेता येणार?

SCROLL FOR NEXT