कोकण

दोडामार्ग तहसील भागात अस्वच्छता

CD

06067

दोडामार्ग तहसील भागात अस्वच्छता

युवासेना : प्रशासनाच्या निष्‍कियतेवर बोट, आठ दिवसांची डेडलाईन

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. २२ : येथील तहसील कार्यालय परिसरात दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या अस्वच्छतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. कार्यालयीन कामासाठी येणाऱ्या लोकांना कचरा, दुर्गंधी, वाढलेली झाडी आणि अस्ताव्यस्त उभ्या केलेल्या वाहनांमुळे त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळेच हा प्रकार झाला आहे, असा आरोप ठाकरे युवासेनेने केला. तसेच आठ दिवसांत परिसर स्वच्छ करून पोलिसांनी जप्त केलेली वाहने नियोजनबद्ध न लावल्यास तहसील कार्यालयाच्या पायऱ्यांवर आंदोलन करू, असा इशाराही दिला.
या समस्येबाबत युवा सेना कार्यकर्त्यांनी तहसीलदार राहुल गुरव व पोलिस उपनिरीक्षक आशीष भगत यांची भेट घेऊन परिसरातील अडचणींबाबत चर्चा केली. ठाकरे युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मते, ‘दोडामार्ग तहसील आवारात अस्वच्छता आहे. ठिकठिकाणी वाढलेली झुडपे, रस्त्यावर साचलेला कचरा आणि वापरात नसलेली पाण्याची टाकी ही कचरा साठवणुकीची जागा बनल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. दोडामार्ग पोलिसांकडून जप्त केलेल्या वाहनांची एकीकडे लांबच लांब रांग लावल्याने संपूर्ण आवार अस्वच्छ बनला आहे. या गाड्यांची योग्य मांडणी नसल्याने जागेचा वापर करणे कठीण बनले आहे. कार्यवाही न झाल्यास आंदोलन करू.’
---
...तर आंदोलन अटळ!
युवासेना तालुकाप्रमुख मदन राणे म्हणाले की, ‘तहसील कार्यालय हे नागरिकांच्या दैनंदिन कामाचे केंद्र आहे. प्रशासन स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणार असेल, तर सामान्य नागरिक कुठे न्याय मागणार? हे चित्र बदललेच पाहिजे, आठ दिवसांत संपूर्ण परिसराची स्वच्छता करून आवार नीटनेटके न केल्यास आंदोलन छेडू.’ यावेळी उपतालुकाप्रमुख संदेश राणे, सिद्धेश कासार, प्रदीप सावंत, समीर म्हावसकर आदी उपस्थित होते.
.........................
शौचालय वापराविना
कसई-दोडामार्ग नगरपंचायतीकडून तहसील आवारात बांधण्यात आलेले सार्वजनिक शौचालय अजूनही नागरिकांसाठी अद्याप खुले करण्यात आले नाही. याबाबत युवासेनेने सवाल उपस्थित केला. पाण्याची योग्य व्यवस्था करून हे शौचालय तत्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
---
कोट
परिसराच्या स्वच्छतेसाठी बांधकाम विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. जप्त गाड्या सुव्यवस्थित लावण्याबाबत पोलिस विभागालाही निर्देश दिले जातील.
- राहुल गुरव, तहसीलदार, दोडामार्ग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठी घसरण! सर्वसामान्यांना दिलासा; पाहा आजचा ताजा भाव

किती क्युट! शशांक केतकरची लेक सेम टू सेम त्याच्यासारखीच, नाक, डोळे पाहून नेटकरी म्हणाले... Viral Video

Mumbai Doctor Case : 'तुझा पुरुषी अहंकार आता तरी..'; मुंबईतील डॉक्टर तरुणीने घेतला गळफास, 6 पानांच्या सुसाईड नोटमध्ये काय? स्तुतीसोबत असं का वागला प्रियकर फैजुल खान?

Jalgaon मुंबई-नागपूर महामार्गावर अर्टिगा कारने चौघांना उडवलं, दोन नंबर प्लेट अन् गाडीत पोलिसांच्या काठ्या

Kim Jong Un missile test : किम जोंग उन अमेरिका -इराण युद्धात उतरणार? क्षेपणास्त्रांच्या केल्या चाचण्या, किम जोंग यांची मुलगी उपस्थित

SCROLL FOR NEXT