कोकण

खेड पालिका वार्तापत्र

CD

खेड पालिका वार्तापत्र--लोगो

युतीला महाविकास आघाडीची कडवी झुंज
खेड ः खेड पालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोमाने प्रचारकार्यात गुंतले असून, नगराध्यक्षपदाची निवडणूक रंगतदार ठरणार आहे. ही निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हींकडून प्रतिष्ठेची करण्यात आली असली आणि महायुतीच्या नेतेमंडळीकडून महायुती म्हणून जाहीरपणे सांगितले असले तरी देखील महायुतीमधील राष्ट्रवादी अजित पवार गट आणि रिपाइं आठवले गट यांचा अद्यापही नाराजीचा सूर दिसून येत आहे.
--सिद्धेश परशेट्ये, खेड
---
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदेसेनेच्या माधवी राजेश बुटाला, ठाकरे गटाच्या सपना ऋषिकेश कानडे व वंचित बहुजन आघाडीच्या सीमा जाधव-शिंदे अशा तिघींमध्ये नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. नगरपालिकेच्या १० प्रभागातील २० जागांपैकी तब्बल १० ठिकाणी ठाकरे सेना विरुद्ध शिंदेसेना यांच्यात थेट लढती होणार आहेत. प्रभाग ६ मधून शिवसेनेचे सतीश चिकणे, प्रभाग १ मधून निकेतन पाटणे, प्रभाग २ मधून दीप्ती शिगवण, प्रभाग ३ मधून सुनील दरेकर, प्रभाग ४ मधून तौसिफ खोत, प्रभाग ९ मधून भूषण चिखले, ठाकरे पक्षाकडून प्रभाग २ मधून मनीषा निर्मळ, प्रभाग ८ मधून सुरभी धामणस्कर व प्रभाग ५ मधून बाळाराम खेडेकर, काँग्रेसकडून प्रभाग १० मध्ये बशीर मुजावर व प्रभाग ७ मधून कौसर मुजावर असे ११ माजी नगरसेवक पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या सर्वच उमेदवारांना विरोधी पक्षाच्या नवख्या उमेदवारांकडून कडवे आव्हान दिले जात आहे.
खेडमध्ये महायुतीमधील राष्ट्रवादी अजित पवार गट आणि रिपाइं आठवले गट यांचा अद्यापही नाराजीचा सूर दिसून येत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाने उघडपणे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिलेला दिसून येतो तसेच त्यांनी काही ठिकाणी उमेदवार उभे केले असून, त्याचा निश्चितच फटका युतीच्या उमेदवारांना बसेल, अशी शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Attack: भारत संतप्त! होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजावर इराणचा हल्ला; भारतीयांच्या मृत्यूने तणाव वाढला, केंद्र सरकारचा इशारा

Nagpur Bench Verdict : अनैतिक संबंधातून जन्मलेल्या मुलांनाही समान हक्क; नागपूर खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय

Indian crew killed in Hormuz attack : इराणचा होर्मुझ समुद्रधुनीतील जहाजावर हल्ला, दोन भारतीयांचा मृत्यू तर एक बेपत्ता

T20 World Cup साठी भारतीय संघातून डच्चू अन् मग वडिलांनाही गमावलं; जितेश शर्माने सांगितला 'तो' कठीण काळ

Sangola Political: सांगोला तालुक्यात राजकीय भूकंप! साळुंखे-पाटलांचे पंचायत समितीचे तीन सदस्य भाजपमध्ये, पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा मास्टरस्ट्रोक..

SCROLL FOR NEXT