06076
विकास काय असतो हे दाखवून देऊ
राजन तेली : कणकवलीत ड्रेनेज व्यवस्था अद्ययावत का नाही?
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २२ : उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली विकास काय असतो तो आम्ही कणकवली शहरवासीयांना दाखवून देणार आहोत, अशी ग्वाही माजी आमदार तथा शिंदे शिवसेनेचे नेते राजन तेली यांनी आज दिली. कणकवली शहरात आजपर्यंत ड्रेनेज व्यवस्था, अद्ययावत गार्डन, सुसज्ज नाट्यगृह अशी कामे का झाली नाहीत, असा प्रश्नही त्यांनी केला.
येथील आपल्या निवासस्थानी श्री. तेली यांनी पत्रकार परिषद घेतली. ठाकरे शिवसेना पक्षाचे विधानसभा संघटक सतीश सावंत, शिंदे शिवसेनेचे शंकर पार्सेकर, शेखर राणे आदी उपस्थित होते.
श्री. तेली म्हणाले, ‘कुडाळ आणि मालवणप्रमाणेच कणकवली शहराच्या विकासाचे मॉडेल तयार केले आहे. त्याचे सादरीकरण लवकरच करणार आहोत. कुडाळ-मालवणचे आमदार नीलेश राणे यांनी अवघ्या एका वर्षात मालवणात नाट्यगृह सुसज्ज करण्यासाठी १२ कोटींचा निधी आणला. महामार्ग ते कुडाळ एमआयडीसीपर्यंतचा रस्ता दर्जेदार करून दाखवला. त्यामुळे शाश्वत विकास कसा असतो, तो महाआघाडीच्या माध्यमातून कणकवलीतही करून दाखवणार आहोत.
कणकवलीच्या कुठल्याही प्रभागात गेलात तर तेथे डासांचा प्रादुर्भाव दिसतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी शहरात कुठेही विरंगुळा केंद्र नाही. अद्ययावत गार्डन नाही. नगपंचायतीने काय धबधबा उभारला, तो शहरवासीय पाहत आहेत. शहरात अजूनही क्रीडांगण नाही. सुसज्ज नाट्यगृहही नाही. मी आमदार असताना शहरातील ड्रेनेज व्यवस्था सुधारण्यासाठी निधी दिला होता; मात्र, प्रत्यक्षात काहीही काम झाले नाही. त्यामुळे जबाबदार नेत्या-कार्यकर्त्यांच्या हातात सत्ता असावी, असा प्रचार आम्ही कणकवलीत करत आहोत.’
ते पुढे म्हणाले, ‘आमदार राणे हे कणकवलीच्या प्रचारात सक्रिय झाल्यानंतर भाजपची काही मंडळी त्यांच्यावर टीका करत आहेत; मात्र शिंदे शिवसेनेतर्फे कणकवली आणि मालवणची जबाबदारी आमदार राणे यांच्याकडे दिली आहे. ही जबाबदारी ते चोखपणे सांभाळत आहेत. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनी आधी आपला इतिहास पाहावा. त्यानंतर कुणाला नगराध्यक्षपद मिळाले, हा सर्व इतिहास कणकवलीकरांना ज्ञात आहे.’
.......................
म्हणून कणकवलीत नवीन प्रयोग
कणकवलीची जनता भयभीत होती. कुठल्याही मुद्यावर शहरातील लोक चारचौघात बोलत नव्हते. नगरपंचायतीकडून दाखले मिळणार नाहीत, त्यांची कामे होणार नाहीत, अशी त्यांना भीती होती. ही भीती दूर करण्यासाठी सर्व पक्षांची पादत्राणे बाहेर ठेवून शहर विकास आघाडीचा नवा प्रयोग कणकवलीत केला. शहराच्या प्रत्येक प्रभागात गेल्यानंतर शहरवासीयांमधील खदखद बाहेर येताना दिसते आहे, असेही श्री. तेली म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.