कोकण

सीईओ वैदेही रानडे यांनी केली पाहणी

CD

कडवई गावातील विकासकामांची
सीईओ वैदेही रानडेंकडून पाहणी
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २४ ः मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातील प्राथमिक पहाणी करणे व मार्गदर्शन यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी कडवई गावाला भेट दिली. त्यांनी विविध विकासकामे, योजना व प्रकल्प यांची पहाणी करून मार्गदर्शन केले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी कडवई ग्रामपंचायतीने सहभाग घेतलेला आहे. गटविकास अधिकारी आनंद लोकरे व सहायक गटविकासाधिकारी विनोदकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामअधिकारी राहुलकुमार चौधरी यांच्या सहकार्याने कडवई ग्रामपंचायतीच्या वतीने या अभियानातील सर्व कामे पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरपंच विशाखा कुवळेकर व उपसरपंच दत्ताराम ओकटे व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी यांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम सुरू आहे. जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी कडवई येथे भेट देऊन ग्रामपंचायतीने केलेल्या कामाची पाहणी केली. नीलेश कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. ग्रामधिकारी राहुलकुमार चौधरी यांनी अहवाल सादर केला. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील, सामान्य प्रशासन उप मुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंग जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठले, गटविकास अधिकारी आनंद लोकरे, सहाय्यक गटविकास अधिकारी विनोदकुमार शिंदे, महिला बालविकास प्रकल्प अधिकारी मल्लिनाथ कांबळे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Attack: भारत संतप्त! होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजावर इराणचा हल्ल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचा इशारा, तणाव वाढला!

Nagpur Bench Verdict : अनैतिक संबंधातून जन्मलेल्या मुलांनाही समान हक्क; नागपूर खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय

Indian crew killed in Hormuz attack : इराणचा होर्मुझ समुद्रधुनीतील जहाजावर हल्ला, दोन भारतीयांचा मृत्यू तर एक बेपत्ता

T20 World Cup साठी भारतीय संघातून डच्चू अन् मग वडिलांनाही गमावलं; जितेश शर्माने सांगितला 'तो' कठीण काळ

Sangola Political: सांगोला तालुक्यात राजकीय भूकंप! साळुंखे-पाटलांचे पंचायत समितीचे तीन सदस्य भाजपमध्ये, पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा मास्टरस्ट्रोक..

SCROLL FOR NEXT