कोकण

निवडणुकीत योग्य न्याय न देणे हे अन्यायकारक

CD

निवडणुकीत योग्य न्याय न देणे हे अन्यायकारक
राजू जाधवः रिपब्लिकन पक्षांचे गट जागावाटपात बेदखल
चिपळूण, ता. २३ ः पालिका निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीसोबत तसेच स्वतंत्रपणे असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या गटांना प्रस्थापित राजकीय पक्षांनी जागावाटपात पूर्णतः बेदखल केले आहे. केवळ मतांसाठी आंबेडकरी चळवळीतील लोकांचा, पक्षांचा वापर करून घेणे व स्थानिक पातळीवरील निवडणुकातही योग्य तो न्याय न देणे ही भूमिका अत्यंत अन्यायकारक असून त्याचा विचार गंभीरपणे करण्याची आवश्यकता आहे, असे चिपळूण येथील रिपब्लिकन कार्यकर्ते राजू जाधव यांनी सांगितले.
नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष पूर्ण ताकदीनिशी उतरलेले आहेत. विशेषतः सत्ताधारी भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी महायुती या प्रमुख पक्षांसोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट) सोबत आहेत. महाविकास आघाडीत शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), काँग्रेस यासोबत आरपीआय (गवई गट) आरपीआय (खरात गट) व इतर रिपब्लिकन गट सोबत आहेत. काही रिपब्लिकन गट व इतर आंबेडकरी चळवळीतील पक्ष वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी व इतर स्वतंत्रपणे कार्यरत आहेत. मात्र या स्थानिक निवडणुकांमध्ये सर्वच प्रस्थापित पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले असताना आपल्या छोट्या मित्र पक्षांचा त्यांना विसर पडला आहे. सत्ताधारी आणि विरोधात आघाडीला साथ देणाऱ्या रिपब्लिकन गटांना, आंबेडकरी चळवळीतील इतर पक्षांना दोन्हीकडून अन्यायकारक वागणूक मिळत असल्याचे दिसून आले आहे. इतकेच नव्हे तर पूर्णतः बेदखल करण्याचा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट निरीक्षण जाधव यांनी मांडले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT