कोकण

८०० कोटी आले? विकास का रखडला? ः पारकर

CD

06294

८०० कोटी आले? विकास
का रखडला? ः पारकर

कणकवलीकर भ्रष्‍टाचाऱ्यांना जागा दाखवतील

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २३ ः शहरासाठी गेल्‍या आठ वर्षांत किमान ८०० कोटींचा निधी आला. या निधीतून कोणती विकासकामे झालीत? हे सत्ताधाऱ्यांनी दाखवावे. त्या निधीतून शहराचा नाही तर नेमक्‍या व्यक्‍तींचाच विकास झाला. आता याच पैशातून मतदार खरेदी केले जाणार आहेत. पण, कणकवलीकर जनता आता तुमची गुलामी स्वीकारणार नाही, भ्रष्‍टाचाऱ्यांना त्‍यांची जागा दाखवून देईल, असे प्रतिपादन शहर विकास आघाडीचे नगरध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी आज येथे केले.
पारकर यांनी आपल्‍या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. ते म्‍हणाले, ‘निवडणूक प्रचारादरम्‍यान भाजपची मंडळी वैयक्तिक आरोप करत आहेत. ज्‍यांनी राणेंचे फोटो बाजूला सारले, त्‍यांना निलेश राणे मदत करणार नाहीत असा खोटा प्रचार करत आहेत. खरे तर मी राणेंसोबत होतो, त्‍यावेळी त्‍यांच्याशी एकनिष्‍ठ राहिलो. आमच्यावर आरोप करणाऱ्यांचे राणेंवर बेगडी प्रेम आहे. भाजपला सक्षम उमेदवार मिळाले नसल्‍याने बंगले, घरे जाळणाऱ्यांनाच उमेदवारी द्यावी लागली हे दुर्दैव आहे.’
पारकर म्‍हणाले, ‘एका बाजूने विकासाच्या मुद्यावरच प्रचार करणार, असे भाजपची नेतेमंडळी सांगत आहेत. दुसऱ्या बाजूला मात्र ते वैयक्‍तिक टीका करून सहानुभती मिळविण्याचा प्रयत्‍न करत आहेत. मागील पाच वर्षात फक्त भ्रष्‍टाचार करण्यासाठीच विकासकामे उभी करण्यात आली. जनतेला दाखवण्यासारखे एकही विकासकाम नाही. त्‍यामुळे भाजपचे नेते आता वैयक्‍तिक आरोप करू लागले आहेत.’
ते म्‍हणाले, ‘कुणाचाही संसार आम्ही उद्‍ध्वस्त केला नाही. राजकीय आंदोलने व्यक्‍तिरिक्‍त आमच्यावर कधी गुन्हे नव्हते. मात्र, भाजपने ज्‍यांना उमेदवारी दिलीय, त्‍यांना अनेक गुन्ह्यांमध्ये शिक्षा सुनावली आहे. मात्र, वरच्या न्यायालयात गेल्याने या खटल्‍यांना स्थगिती आहे. स्थगिती असल्‍यानेच भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अर्ज भरू शकले.’
------------------
जुन्या इमारतींमधील भाडेकरू, मालक बेघर
शहरात अनेक जुन्या इमारती रातोरात पाडल्‍या. त्‍याठिकाणी नवीन संकुले उभी केली जात आहेत. मात्र, इमारत पाडल्यानंतर त्‍यातील भाडेकरू, जमीन मालकांना बेदखल केले आहे. अनेक जमिनींवर बेकायदा ताबा आहे. राष्‍ट्रीय महामार्ग चौपदरीकरणानंतर महामार्ग दुतर्फा जी जागा शिल्‍लक राहिली, त्‍या जागेचे विक्रेत्‍यांना वाटप केले. त्‍यातून तब्‍बल ९ लाखांची अवैध भाडे वसूली शहरातील भाजपची मंडळी करत आहेत. जागा महामार्ग प्राधिकरणची तर अवैध रूपाने भाडे वसूली भाजपचे कणकवलीतील उमेदवार करत असल्‍याचा आरोपही श्री.पारकर यांनी केला.
----------------
06273

निधी कोण देणार? हे
कणकवलीकर जाणतात

नीतेश राणे ः विकासाच्या मुद्यावरच प्रचारात

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २३ ः शहर विकासासाठी जास्तीत जास्त निधी कॅबिनेटमंत्री आणणार की आमदार? हे कणकवलीकरांना माहिती आहे. मागील पाच वर्षांत आम्‍ही रस्त्यांचे जाळे निर्माण केले. पुढील पाच वर्षात ड्रेनेज, सुसज्ज नाट्यगृह, भव्य मराठा भवन उभे करणार आहोत. आम्‍ही विकासाच्या मुद्यावरच प्रचारात उतरलो आहोत. निकाल लागल्‍यानंतर इतर सर्व राजकीय मुद्यांवर बोलू, असे प्रतिपादन पालकमंत्री नीतेश राणे यांनी आज येथे केले.
येथील प्रहार भवनमध्ये श्री.राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे उपस्थित होते. श्री. राणे म्‍हणाले, ‘पाच वर्षांत आम्‍ही कणकवली शहरासाठी काय केलं आणि पुढील पाच वर्षांत काय करणार? याबाबत विकासाचे व्हीजन घेऊन आम्‍ही मतदारांपुढे जात आहोत. गेल्‍या पाच वर्षांत कणकवली शहरात रस्त्यांचे सुसज्‍ज जाळे निर्माण झाले. पूर्वी शहरात येण्यासाठी शंभर रूपयांपेक्षा जास्त खर्च यायचा. आता चाळीस-पन्नास रूपये भाडे देऊन शहराच्या कुठल्‍याही भागात जाता येत आहे. एवढे दर्जेदार रस्ते तयार झाले आहेत. कृत्रिम धबधब्‍याच्या मुद्यावर विरोधक टीका करत आहेत. मात्र, त्‍याच धबधब्याखाली शहरातील चिमुकली मुले बागडण्याचा आनंद घेत आहोत याचे आम्‍हाला समाधान आहे.’
ते म्‍हणाले, ‘मागील पाच वर्षांत आम्‍ही कणकवलीत बरेच बदल केले. आंतरराष्‍ट्रीय दर्जाची इंग्रजी माध्यमाची शाळा कणकवलीत आली आहे. स्पोर्ट कॉम्प्लेक्‍स तयार झालेय. याखेरीज शहरात पर्यटक यावेत, महामार्गामुळे मंदीच्या सावटाखाली आलेल्‍या बाजारपेठेला पुन्हा चांगले दिवस यावेत यासाठी विविध उपक्रम आम्‍ही प्रस्तावित केले असून पुढील पाच वर्षात ते निश्चितपणे पूर्ण होणार आहेत.’
मंत्री राणे म्‍हणाले, ‘मी दोन वेळा आमदार होतो तर तिसऱ्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी कॅबिनेट मंत्री केले. आमदार आणि कॅबिनेटमंत्री यामध्ये कोण जास्त निधी आणू शकतो? हे मला माहिती आहे. इथल्‍या जनतेलाही ते माहिती असल्‍याने शहरवासीयांचा कौल पुन्हा एकदा भाजपलाच असेल. तसेच कणकवली शहरातील वातावरण बिघडेल असे आम्‍ही काहीही करणार नाही आणि होऊ देणार नाही.’
शहरातील सर्व विकासकामे पाच वर्षांत होऊ शकत नाहीत. याची पूर्ण कल्‍पना आहे. पुढील पाच वर्षांत कणकवलीची नळपाणी पुरवठा योजना आणि सांडपाणी निचरा व्यवस्था मार्गी लावणार आहोत. नाट्यगृहासाठी सांस्कृतिकमंत्री आशिष शेलार यांच्या माध्यमातून १० कोटींचा निधी उपलब्‍ध होणार आहे. तसेच स्पोर्ट कॉम्प्लेक्‍सच्या उर्वरीत कामासाठीही लवकरच निधी मंजूर होणार आहे. खासदार नारायण राणेंचा आदर्श ठेवून समीर नलावडे यांनी पाच वर्षांत काम केले. कोविड आणि त्‍यांनतरच्याही काळात नलावडे आणि त्‍यांच्या टीमने शहरवासीयांसाठी जीव धोक्‍यात घालून काम केले. शहरातील प्रत्‍येकाचे काम वेळेत होण्यासाठी आमची टीम सज्‍ज राहिली. शहरात एका व्यक्‍तीच्या तरी दाखल्‍याचे काम अडले का? हे विरोधकांनी दाखवून द्यावे.’
---------------------
बोगस मतदारांबाबत यंत्रणा सक्षम
कणकवली शहरात बोगस मतदारांचा मुद्दा चर्चेला आहे. या मतदारांना मतदानापासून रोखण्याचा इशारा आघाडीच्या नेत्‍यांनी दिला आहे. या मुद्यावरही श्री. राणे म्‍हणाले की, ‘माजी आमदार वैभव नाईक यांच्या घराच्या पत्त्यावरही अनेक बोगस मतदार नोंदणी झालेले आहेत. मात्र, त्‍याबाबत आम्‍ही काहीही बोलणार नाही. निवडणूक आयोगाकडे सर्वाधिकार आहेत. शांतता अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्षम आहे. बोगस मतदारांच्या मुद्द्यावर या यंत्रणा आपली जबाबदारी बजाववतील.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्मृतीच्या वडिलांनंतर पलाश मुच्छलचीही प्रकृती बिघडली, रुग्णालयात घेतले उपचार

सांगलीत ड्रंक अँड ड्राइव्हचा थरार! राँग साइडने चालवली स्कोडा, ६-७ वाहनांना धडक; अनेकजण जखमी

दुर्दैवी घटना! 'शेतीत मशागत करताना रोटरमध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू'; कागल तालुक्यातील घटना, अचानक तोल गेला अन्..

CM Eknath Shinde: आमचा शत्रू फक्त महाविकास आघाडीच: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; स्थानिकमध्ये एकमेकांविरुद्ध लढलो म्हणजे शत्रू नाही

Crime News : पुण्यात घरफोडी करणारी तरुणींची टोळी, विदर्भातून सहा जणींना घेतलं ताब्यात; VIDEO झालेला व्हायरल

SCROLL FOR NEXT