कोकण

निलेश राणे-बाबुराव धुरी बातम्या

CD

swt241.jpg
06370
मालवणः आमदार म्हणून वर्षपूर्तीच्या निमित्ताने जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते नीलेश राणे यांचा सत्कार करण्यात आला. (छायाचित्रः गणेश गावकर)

शिवसेना जनतेचा विश्वास जपणारा पक्ष
नीलेश राणेः आडवलीत मालडीत प्रतिपादन
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २४ : शिवसेना जनतेचा विश्वास जपणारा पक्ष आहे. जनतेला अपेक्षित असलेली सर्व विकासकामे पूर्ण केली जातील. मालवण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन आमदार नीलेश राणे यांनी येथे केले.
श्री. राणे यांच्या विधानसभेतील विजयाच्या वर्षपूर्ती निमित्ताने येथील शहर प्रचार कार्यालयात आयोजित कार्यक्रमात तालुक्यातील आडवली मालडी जिल्हा परिषद मतदारसंघातील निरोम, असगणी, ओवळीये व गोठणे येथील ठाकरे शिवसेना पदाधिकारी व अनेक कार्यकर्त्यांनी आमदार राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी आमदार राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे शिवसेनेत स्वागत केले.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, विधानसभा प्रमुख बबन शिंदे, संजय पडते, व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, माजी सभापती सुनील घाडीगावकर, विश्वास गावकर, तालुकाप्रमुख विनायक बाईत, दादा परब, बाळू कुबल, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, मकरंद राणे, कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर, संपर्क प्रमुख राजेश गावकर, पंकज वर्दम उपस्थित होते.
आदर्श मतदारसंघ बनवण्यासाठी आमदार राणे सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वात मतदारसंघात शिवसेनेचा परिवार वाढत आहे. शिवसेनेवर मालवणवासीयांचे प्रेम असून येथील पालिकेवर आमदार राणे यांच्या नेतृत्वात भगवा फडकेल, असा विश्वास जिल्हाप्रमुख सामंत यांनी व्यक्त केला. बाळू कुबल, बबन शिंदे, बंडू चव्हाण यांनी विचार मांडले.

चौकट
मालवणवासीयांना विजयाची भेट देऊ
शिवसेना मुख्यनेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांचा शब्द आमच्यासाठी अंतिम आहे. महायुतीतील घटक पक्षाने खासदार राणे यांचा शब्द पाडला; मात्र आम्ही तो न पाडता ३ तारखेला पालिकेवर भगवा फडकवून मालवणवासीयांना अनोखी भेट देऊ, असेही आमदार राणे यांनी सांगितले.

swt242.jpg
06374
वेंगुर्ले ः पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी. सोबत यशवंत परब, संजय गावडे आदी.

वेंगुर्लेत आरोग्य सुविधा नसणे दुर्दैवी
बाबुराव धुरी ः ठाकरे शिवसेनेकडूनच शाश्वत विकास
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २४ ः शहरातील नागरिकांना आरोग्य सेवेसाठी गोवा राज्यावर अवलंबून राहावे लागते. गेली २५ वर्षे या मतदारसंघाचे नेतृत्व करणारे आमदार दीपक केसरकर यांची चांगली आरोग्य सेवा देण्याची जबाबदारी होती; मात्र डायलिसिसची सुविधाही नसणे हे दुर्दैव आहे. वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक सोयी सुविधेबरोबर तज्ज्ञ डॉक्टर आणि मशिनरी नसल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. या शहराचा शाश्वत विकास ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून करणार असल्याचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
येथील ठाकरे शिवसेना कार्यालयात शनिवारी (ता. २२) पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी उपजिल्हा प्रमुख लक्ष्मण आयनोडकर, उपजिल्हा संघटक विजय जाधव, वेंगुर्ले तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, उपतालुका प्रमुख संजय गावडे उपस्थित होते.
श्री. धुरी म्हणाले, ‘‘वेंगुर्ले शहरात उपजिल्हा रुग्णालय महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असताना स्थापित करण्यात आले होते. त्यानंतर चांगली आरोग्य सेवा देण्याची जबाबदारी पुढील सरकारची होती. त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले. वेंगुर्ले बंदराचा विकास असेल, शहरातील गटारांचा व रस्त्यांचा, आरोग्य सेवेबरोबरच इतर प्रश्नांचे २४ मुद्दे पक्षाच्या जाहीरनाम्यात प्रसिध्द केले जातील. वेंगुर्लेनगरीचा खऱ्या अर्थाने विकास करणार आहोत. कष्टकरी व प्रामाणिक तसेच शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कर्तृत्व असलेल्या उमेदवाराला आम्ही संधी दिली आहे. वेंगुर्ले शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष संदेश निकम तर नगरसेवक पदासाठी १८ उमेदवार दिले असून त्यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘शेतकरी, व्यापारी, मत्स्य व्यावसायिक तसेच आरोग्य सेवेमध्ये होत असलेली हेळसांड आणि वाढती बेरोजगारी या महत्त्वपूर्ण बाबींबाबत मतदारांच्या मनात सरकारविरोधात नाराजीचा सूर आहे. त्यामुळे वेंगुर्ले पालिका निवडणुकीत मोठे परिवर्तन होणार आहे. महाविकास आघाडीत आम्ही असल्याने पालिका निवडणुकीत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आम्हाला मिळणार आहे.’’

चौकट
‘ताज’ प्रकल्प आणताना भूमिपुत्रांचे प्रश्नही सोडवू
ताज प्रकल्प व्हावा ही आमची पूर्वीपासूनची मागणी आहे. मात्र हा प्रकल्प पूर्णत्वास जात असताना स्थानिक भूमीपुत्रांचे प्रश्न मार्गी लागणे गरजेचे आहे. यामुळे पालकमंत्री यांनी पूर्ण वेळ देऊन ताज प्रकल्पाचे जे बाधित शेतकरी आहेत त्यांच्याशी संवाद करून त्यांचे प्रश्न सोडवावेत त्याचे आम्ही स्वागत करू असेही यावेळी बाबुराव धूरी म्हणाले. एक हाती सत्ता असताना ज्यांना विकास जमला नाही त्यांनी वेंगुर्ले शहरात विकासाच्या गोष्टी करू नये. वेंगुर्लेत असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात सर्वप्रथम डॉक्टर अगोदर उपलब्ध करून द्यावेत. नंतर दुसरं खासगी रुग्णालय आणण्यास आमचा विरोध नसेल, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Female News Anchor Suicide : खळबळजनक! महिला न्यूज अँकरची चॅनलच्या ऑफिसमध्येच गळफास लावून आत्महत्या

Smriti - Palash Wedding: 'स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृतीमुळे...', भाऊ पलाशचं लग्न लांबणीवर पडल्यानंतर पलक मुच्छलची पोस्ट

Sunidhi Chauhan Concert : ‘देसी गर्ल’च्या मैफिलीची उत्सुकता; ‘स्वास्थ्यम्’ मध्ये ६ डिसेंबरला ‘सुनिधी चौहान कॉन्सर्ट’!

Palghar News : मोखाड्यात प्रसुत मातेची बाळाला घेऊन जंगलातुन २ किलोमीटर पायपीट; रूग्णवाहीका चालकाने अर्ध्यावरच सोडल्याने ओढवला प्रसंग!

Latest Marathi News Live Update : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT