कोकण

मदर क्विन्स इंग्लिश स्कूलचा दबदबा

CD

swt243.jpg
06375
सावंतवाडी ः रंगोत्सव सेलिब्रेशन स्पर्धेत मदर क्विन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले.

मदर क्विन्स इंग्लिश स्कूलचा दबदबा
़‘रंगोत्सव सेलिब्रेशन’ स्पर्धाः २३१ विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २४ः सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित येथील मदर क्विन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी रंगोत्सव सेलिब्रेशन नॅशनल लेवल आर्ट स्पर्धेमध्ये उत्तुंग यश संपादित केले. रंगोत्सव सेलिब्रेशनतर्फे कलरिंग, कोलाज, स्केचिंग, हॅन्ड रायटिंग, मास्क मेकिंग, टॅटू मेकिंग, कॅरी कॅचर, फिंगर अँड थम पेंटिंग, ग्रीटिंग कार्ड, कार्टून मेकिंग आदी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये नर्सरी ते दहावीपर्यंतचे ४९६ स्पर्धक सहभागी झाले. त्यातील २३१ विद्यार्थी इंटरनॅशनल लेवल आर्ट स्पर्धेसाठी पात्र ठरले. कलरिंग कॉम्पिटिशनमध्ये आराध्या चव्हाण हिने प्रथम, वैदेही गोठणकर हिने तृतीय, वर्धन बुवा याने चतुर्थ क्रमांक पटकावला. कार्टून मेकिंगमध्ये ईश्वरी सावंत हिने द्वितीय, फिंगर अँड थम पेंटिंग प्रकारात भार्गवी वाळके हिने द्वितीय, अन्वी राठोड हिने कार्टून मेकिंगमध्ये ''फाईव्ह स्टार ब्रिलियंट अवॉर्ड'' मिळविला. अर्णव माने हा कोलाज कॉम्पिटिशनमध्ये, तर अथर्वी मांजरेकर ही कलरिंगमध्ये एक्सलंट अवॉर्डची मानकरी ठरली.
या विविध स्पर्धांमध्ये पाच विद्यार्थी ‘आर्ट मेरिट अवॉर्ड’चे मानकरी ठरले. तसेच १९ विद्यार्थ्यांनी कन्सोलेशन प्राईज व २१ विद्यार्थ्यांनी केजी गिफ्ट मिळविले. शिवाय ९६ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक, ८१ विद्यार्थ्यांनी रौप्य व ६० विद्यार्थ्यांनी कांस्यपदक पटकावले. स्पर्धा समन्वयक अमिना नाईक यांना जेमिनी रॉय अवार्ड, मदर क्विन्स इंग्लिश स्कूल या प्रशालेस इंडियाज अॅक्टिव्हिटीज एक्सलन्स अवॉर्ड, प्रशालेच्या मुख्याध्यापिका अनुजा साळगावकर यांना द लिडरशिप इन एज्युकेशन अवॉर्ड व संस्थेच्या चेअरमन शुभदादेवी भोसले यांना द ट्रान्स्फॉरमेटिव्ह कॉन्ट्रिब्युशन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.
या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष खेमसावंत भोसले, चेअरमन शुभदादेवी भोसले, कार्यकारी विश्वस्त लखमराजे भोसले, विश्वस्त श्रद्धाराजे भोसले, मंडळाचे संचालक दिलीप देसाई, सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, सदस्य जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, मुख्याध्यापिका अनुजा साळगावकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT