कोकण

हातदे-मिळंद पुलाच्या उभारणीकडे दुर्लक्ष

CD

rat24p8.jpg
06363
राजापूर ः हातदे व मिळंद या दोन गावांना जोडणारा जामदा नदीवरील लोखंडी साकव चार वर्षापूर्वी पुराच्या पाण्यात वाहून गेला. अजूनही त्याची दुरुस्ती झालेली नाही.
rat24p13.jpg-
06389
हातदे येथील पुलाचे केवळ पिलर उभे आहेत.
--
हातदे-मिळंद पुलाच्या उभारणीकडे दुर्लक्ष
चार वर्षापूर्वी पुरात गेला वाहून ; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, विद्यार्थी, वृद्धांची गैरसोय
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २४ ः राजापूर तालुक्यातील हातदे व मिळंद गावाला जोडणारा जामदा नदीवरील लोखंडी साकव चार वर्षांपूर्वी मोठ्या महापुरामध्ये वाहून गेला होता. त्यामुळे परिसरातील लोकांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत असून, तातडीने त्या ठिकाणी नव्याने साकव उभारण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
राजापूर तालुक्यातील हातदे व मिळंद गावाला जोडण्यासाठी वीस वर्षांपूर्वी शासनाच्या साकव कार्यक्रमांतर्गत लोखंडी साकव बांधण्यात आला होता. त्यामुळे पावसाळ्यामध्ये होणारी अडचण दूर झाली होती तसेच या साकवामुळे दोन्ही गावातील नागरिक एकदम जवळ आले होते. दळणवळणाच्यादृष्टीने फारच सोयीस्कर झाले होते; परंतु जुलै २०२१ मध्ये जामदा नदीला आलेल्या महापुरामध्ये हा साकव वाहून गेल्यामुळे या दोन्ही गावांचा संपर्क तुटला होता. त्यानंतर तत्कालीन शिवसेनेचे तालुक्याचे आमदार राजन साळवी यांना या ठिकाणी लोखंडी साकव अथवा पादचारी पूल तयार करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले होते; परंतु त्याबाबत कोणतीच हालचाल झाली नाही. गेल्या पावसाळ्यामध्ये या दोन्ही गावांचा संपर्क तुटल्यामुळे लोकांना ये-जा करणे फारच कठीण बनले होते. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर आमदार किरण सामंत यांना ग्रामपंचायतीच्यावतीने निवेदन देण्यात आले; मात्र त्यालाही आता वर्ष झाले तरी त्यावर कार्यवाही झालेली नाही. नागरिकांच्या गैरसोयीचा तातडीने विचार करून पादचारी पुलासाठी निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
-----------
चौकट
नागरिक, विद्यार्थ्यांना सहा किमीचा वळसा
हातदे पाटीलवाडी ते मिळंद राववाडी या दोन गावांना जोडणारा हा ब्रिज जामदा नदीवर आहे. २०२१मध्ये आलेल्या अतिवृष्टीमुळे तो कोसळला. वयोवृद्ध, रुग्ण, शाळा, कॉलेजला जाणारे विद्यार्थी आणि पाचल येथे मुख्य बाजारपेठेत हातदे येथील पूल नसल्यामुळे अडचणीचे होते. नागरिकांना सहा किलोमीटर वळसा मारून जावे लागत असून, पैसा आणि वेळ दोन्ही वाया जातो.
--------
कोट
या संदर्भात गेली चार वर्षे सातत्याने पत्रव्यवहार करत असून, दोन्ही गावातील नागरिकांची होणारी अडचण निवेदनाद्वारे सांगितली जात आहे; परंतु त्याबाबत अजूनही विचार केला जात नाही. त्यामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
- जयप्रकाश चव्हाण, माजी सरपंच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT