कोकण

चिंचघरीत आजपासून डीबीजेचे निवासी शिबिर

CD

सहकार सप्ताहानिमित्त
पूर्णगडमध्ये स्पर्धा
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड येथील खारवी समाज नागरी पतसंस्थेच्या शाखेतर्फे सहकार सप्ताहनिमित्त विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रंगभरण स्पर्धा या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत पूर्णगड नं. १, पूर्णगड खारवीवाडा, गावडेआंबेरे खारवीवाडा, मेर्वी शाळांनी सहभाग घेतला. या उपक्रमाला शाखा पालक वासुदेव वाघे, जयवंत डोर्लेकर, आडविलकर मॅडम, शाखाधिकारी निखिल आंबेरकर, पर्णिका आंबेरकर आदी उपस्थित होते.
--------------
चिंचघरीत आजपासून
डीबीजेचे निवासी शिबिर
चिपळूण : येथील डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे निवासी शिबिर २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत चिंचघरी-गणेशवाडी येथे होणार आहे. शिबिराचे उद्घाटन दुपारी ३ वाजता डीबीजेचे प्राचार्य डॉ. माधव बापट यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी न. ए. सोसायटीचे चेअरमन मंगेश तांबे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्या प्रा. स्नेहल कुलकर्णी, चिंचघरी सरपंच अनिता गुरव आदी उपस्थित राहणार आहेत. शिबिरात २५ नोव्हेंबरला सायंकाळी ७ वाजता डॉ. प्रतीक ओक एआयची ओळख या विषयी व्याख्यान देणार आहेत. २६ ला दुपारी ३ वा. कौशल्य प्रशिक्षण, सायंकाळी ७ वा. प्रा. विनायक बांद्रे यांचे ''सूत्रसंचालन कसे करावे'' या विषयावर व्याख्यान, २७ ला दुपारी ३ वा. प्रा. चेतन खांडेकर यांचे ''आधुनिक काळातील आर्थिक व्यवहाराची ओळख ''या विषयी तर २८ ला दुपारी ३ वा. मनोज गांधी यांचे ''शाश्वत शेती व आरोग्य'', सायंकाळी ७ वा. प्रा. हरिश बाबर यांचे ''सर्पविश्व'' या विषयावर माहितीपर व्याख्यान होईल. १ डिसेंबरला सकाळी एड्स जनजागृती फेरी व ११ ला शिबिराची सांगता होणार आहे.
--------
टीईटीविरोधात ५ ला
शिक्षक संघटनांचा मोर्चा
चिपळूण ः टीईटीविरोधात ५ डिसेंबरला राज्यभरात शिक्षक व शिक्षकेत्तर संघटना समन्वय समितीतर्फे महामोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ताकदीने सहभागी होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षकसंघाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अजय गराटे यांनी दिली. या वेळी ते म्हणाले, सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य केल्यामुळे देशभरातील व राज्यातील लाखो शिक्षकांच्या नोकरीवर संकट निर्माण झाले आहे. या संकटातून मार्ग काढण्याऐवजी राज्यसरकारकडून जबाबदारी झटकण्याचा प्रकार पाहायला मिळत आहे. सरकारने टीईटी निर्णयाविरोधात ठोस भूमिका घ्यावी, यासाठी राज्यभरातील शिक्षक शाळा बंद ठेवून मोर्चा काढणार आहेत, अशी माहिती गराटे यांनी दिली.
-------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Female News Anchor Suicide : खळबळजनक! महिला न्यूज अँकरची चॅनलच्या ऑफिसमध्येच गळफास लावून आत्महत्या

Smriti - Palash Wedding: 'स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृतीमुळे...', भाऊ पलाशचं लग्न लांबणीवर पडल्यानंतर पलक मुच्छलची पोस्ट

Sunidhi Chauhan Concert : ‘देसी गर्ल’च्या मैफिलीची उत्सुकता; ‘स्वास्थ्यम्’ मध्ये ६ डिसेंबरला ‘सुनिधी चौहान कॉन्सर्ट’!

Palghar News : मोखाड्यात प्रसुत मातेची बाळाला घेऊन जंगलातुन २ किलोमीटर पायपीट; रूग्णवाहीका चालकाने अर्ध्यावरच सोडल्याने ओढवला प्रसंग!

Latest Marathi News Live Update : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT