कोकण

सरकारनामा

CD

फिरस्ती

खेडमध्ये मनसेचे इंजिन यार्डात विसावले

खेड नगरपालिका निवडणुकीत पाच वर्षांनी वेग घेणाऱ्या मनसेच्या इंजिनला यंदा अचानक ब्रेक लागला आहे. माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी भाजपत प्रवेश केल्यामुळे स्थानिक राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून गेली आहेत. मनसेचे शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे यांच्या पत्नी सपना कानडे नगराध्यक्षपदासाठी निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत; परंतु त्या मनसेच्या इंजिनऐवजी उबाठाच्या मशाल चिन्हावर लढत आहेत. त्यामुळे मनसेचे इंजिन यार्डातच थांबले असून, यंदा मतदारांना इंजिनची नेहमीची धडधड ऐकायला मिळणार नाही, अशी चर्चा खेडमध्ये रंगली आहे. गेल्या दोन दशकांत खेड पालिकेतील राजकारण म्हटले की, मनसे विरूद्ध शिवसेना अशी थेट लढत पाहावयास मिळत होती. शिवसेना नेते रामदास कदम विरुद्ध वैभव खेडेकर हा थरारक सामना अनेक वर्षे खेडच्या राजकीय इतिहासात कोरला गेला. एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नगरपालिकेत सुरुंग लावण्याचे श्रेय मनसेला आणि विशेषतः वैभव खेडेकर यांना जाते. महाराष्ट्रातील प्रथमच मनसेला सत्ता मिळवून देण्याची किमया या खेडमध्ये साधली गेली होती. त्यानंतरच्या निवडणुकीत मनसेने पुन्हा सत्तेच्या चाव्या स्वतःकडेच ठेवल्या. तीन कार्यकाळांमध्ये थेट जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवडून येत वैभव खेडेकर यांनी सत्तेत येण्याची हॅट्ट्रिक साधली होती. ते अन्य पक्षात गेले आणि मनसेच्या चिन्हावर उमेदवारच नाही...अशी चर्चा रंगली आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Gas Cylinder Shortage: बीडमध्ये घरगुती-व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा; ग्राहक रांगेत; साठा असूनही गॅस नाही

Latest Marathi News Live Update : ओडिशात आगीत दहा रुग्णांचा मृत्‍यू

Pune LPG Shortage : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! एलपीजी सिलिंडर घरपोच मिळणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, नागरिकांच्या रांगा झाल्या कमी

Pandharpur News: पंढरपुरातील इस्काॅन मंदिरात प्रसादासाठी पेटल्या चुली; अन्नछत्रालाही गॅस टंचाईचा मोठा फटका, भाविकांच्या भोजनावर मर्यादा!

Beed Road Construction Issue: रस्ता कामाला अडथळ्यांचा फेरा; बीडमध्ये चौपदरीकरणाचा वेग मंदावला; खोदकाम, धुळीचे लोट आणि वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT