कोकण

सरकारनामासाठी

CD

खेडमध्ये शिवसेना-भाजपची दिलजमाई
नगरपालिका निवडणूक ; बदलली समीकरणे, सर्वाधिक तिरंगी लढती
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २४ : खेड पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांत राजकीय घडामोडींना वेग आला आहे; मात्र शिवसेना–भाजप महायुतीमधील अंतर्गत नाराजी दूर करण्यात यश आल्यामुळे गढूळ झालेले राजकीय वातावरण निवळले आहे. त्याचा फायदा महायुतीला होणार आहे. नगराध्यक्ष व नगरसेवकपदासाठी प्रभागांत थेट व तिरंगी लढती होणार आहेत. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी झालेल्या महत्त्वपूर्ण मनोमीलनामुळे सत्तासमीकरणांमध्ये नवे संकेत दिसू लागले आहेत.
भाजपवासी झालेल्या माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी सुरुवातीपासूनच ‘एकला चलो रे’ ची भूमिका घेत पत्नी वैभवी खेडेकर यांचा नगराध्यक्षपदासाठी अपक्ष म्हणून अर्ज भरून शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे केले होते तसेच नगरसेवकपदासाठीही त्यांच्या समर्थकांनी अर्ज भरल्याने शिवसेनेची डोकेदुखी वाढली होती. अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी शिवसेना नेते रामदास कदम व वैभव खेडेकर यांच्यात मनोमीलन झाल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. शिवसेना-भाजप महायुतीने एकत्रित लढण्याचे आदेश असतानाही खेडेकरांच्या अर्जामुळे निर्माण झालेले राजकीय वातावरण तापले होते. भाजपतील नाराज गटाने नगरसेवकपदासाठी भरलेल्या अर्जांनीही संघर्षाची चिन्हे वाढवली होती; परंतु अखेरच्या क्षणी झालेल्या दिलजमाईमुळे सर्व तर्कवितर्क थांबले. वैभवी खेडेकर यांच्या माघारीमुळे शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार माधवी बुटाला यांचा मार्ग सुकर झाला आहे.
खेड पालिका निवडणुकीत बहुतेक प्रभागांत थेट तर काही ठिकाणी तिरंगी लढती होणार आहेत. खेड पालिका निवडणुकीत उबाठा, शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि अपक्ष उमेदवारांमध्ये ठिकठिकाणी चुरस निर्माण झाली आहे. प्रभाग १ अ, १ ब, २ अ यामध्ये उबाठा व शिवसेनेत थेट सामना रंगणार आहे. ३ अ मध्ये शिवसेना व राष्ट्रवादी (शरद पवार) तर ३ ब मध्ये शिवसेना व उबाठा आमनेसामने येणार आहेत. ४ अ, ४ ब, ५ अ, ५ ब तसेच ८ ब, ९ अ, ९ ब, १० अ या प्रभागांतही थेट लढत होणार आहे. प्रभाग २ ब, ६ अ, ६ ब, ७ ब, ८ अ आणि १० ब मध्ये तिरंगी लढती निश्चित झाल्या आहेत. अपक्ष उमेदवार रिंगणात असल्याने लढत चुरशीची होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT