कोकण

महिला शेतकऱ्यांना मूल्यवर्धित पदार्थांचे प्रशिक्षण

CD

महिला शेतकऱ्यांना
मूल्यवर्धित पदार्थांचे प्रशिक्षण
रत्नागिरी ः कोकणात शेतकरी उत्पादक कंपन्यांनी शेतीतील उप्तादनाचा कच्चा माल म्हणून न विकता त्यावर प्राथमिक प्रक्रिया करून पक्का माल म्हणजे मूल्यवर्धित पदार्थ तयार करावेत. शेती फायदेशीर होण्यासाठी व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. महिला शेतकऱ्यांना मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण विद्यापीठामार्फत दिले जाईल. मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्यासाठी विद्यापीठ महिला शेतकऱ्यांना पूर्ण सहकार्य करेल, असे कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. भावे यांनी शेतकरी उत्पादन कंपनीच्या सदस्यांना सांगितले. शहराजवळील शिरगाव पंचक्रोशीत रत्नसागर शेतकरी उत्पादक कंपनी (एफ. पी. सी.) स्थापन करण्यात आली आहे. कंपनीच्या महिला शेतकरी सदस्यांना काही व्यावसायिक आणि तांत्रिक समस्या भेडसावत होत्या. त्या समस्यांची सोडवणूक होण्यासाठी महिला शेतकरी सदस्यांनी मत्स्य अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांच्या मदतीने कुलगुरू डॉ. भावे यांची मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन- शिरगाव येथे सदिच्छा भेट घेतली. विद्यापीठाची कृषी दैनंदिनी भेट दिली आणि शिरगाव येथे महिला शेतकरी मेळावा आणि मूल्यवर्धित पदार्थ प्रशिक्षण आयोजित करण्याचे निर्देश दिले.

राजापूर प्राथमिक संघाच्या अध्यक्षपदी चांगदेव गोसावी
राजापूर : अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची राजापूर तालुक्याची कार्यकारिणी निवड करण्यात आली. तालुका कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी पदवीधर शिक्षक चांगदेव गोसावी यांची, तर सचिवपदी बलभीम पाटील यांची निवड करण्यात आली. सभेला संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी रघुवीर बापट, भीमराव कोंडविलकर, जिल्हा कोषाध्यक्ष मेघनाथ गोसावी, जिल्हा प्रतिनिधी रसाळ, ज्येष्ठ शिक्षक काळे आदी उपस्थित होते. उपाध्यक्षपदी धनाजी माळवे, सागर येवले, कार्याध्यक्ष म्हणून बाबुराव जावळे, कोषाध्यक्षपदी ज्येष्ठ शिक्षक विलास धुमाळे, जिल्हा महिला प्रतिनिधी म्हणून कविता आईर, तालुका महिला आघाडीप्रमुख म्हणून आरती पाटील यांची निवड झाली.

वक्तृत्व स्पर्धेत आंबेडकर विद्यालयाचे यश
मंडणगड ः रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतसंस्थेच्यावतीने आयोजित २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मंडणगड तालुका विकास मंडळ संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी नोंदवली. तालुक्यातील विविध माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्पर्धेसाठी तीन गटांमध्ये विभागणी करण्यात आली होती. कनिष्ठ गटात (पाचवी ते सातवी) : प्रथम क्रमांक कार्तिक कोळेकर, माध्यमिक गट (८ वी ते १० वी) : प्रथम क्रमांक प्रेरणा भोसले, उच्च माध्यमिक गट (इ. ११ वी व १२ वी) : प्रथम क्रमांक आर्यन जगताप यांनी पटकावला.

विद्यार्थ्यांना एआयद्वारे कृषी योजनांची माहिती
मंडणगड ः लोकनेते गोपीनाथ मुंडे महाविद्यालयात गुणवत्ता हमी कक्ष, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्यावतीने कृषी विभागाच्या अॅपवरील विविध योजना आणि स्पर्धा परीक्षेची तयारी या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, प्रा. संदीप निर्वाण, डॉ. महेश कुलकर्णी, स्पर्धा परीक्षा विभागप्रमुख डॉ. भरतकुमार सोलापुरे आदी उपस्थित होते. मंडणगड कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी राज्य कृषी विभागाचा महाविस्तार एआय अॅप विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर डाउनलोड करून देत संबंधित नोंदणी पूर्ण केली. यानंतर तालुका कृषी अधिकारी सोमनाथ अहिरकर यांनी अॅपवर उपलब्ध असलेल्या शासनाच्या विविध कृषी योजनांची आणि सेवांची सविस्तर माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Female News Anchor Suicide : खळबळजनक! महिला न्यूज अँकरची चॅनलच्या ऑफिसमध्येच गळफास लावून आत्महत्या

Smriti - Palash Wedding: 'स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृतीमुळे...', भाऊ पलाशचं लग्न लांबणीवर पडल्यानंतर पलक मुच्छलची पोस्ट

Sunidhi Chauhan Concert : ‘देसी गर्ल’च्या मैफिलीची उत्सुकता; ‘स्वास्थ्यम्’ मध्ये ६ डिसेंबरला ‘सुनिधी चौहान कॉन्सर्ट’!

Palghar News : मोखाड्यात प्रसुत मातेची बाळाला घेऊन जंगलातुन २ किलोमीटर पायपीट; रूग्णवाहीका चालकाने अर्ध्यावरच सोडल्याने ओढवला प्रसंग!

Latest Marathi News Live Update : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT