कोकण

अरुंद रस्ते, अपुऱ्या गटारांसह विविध समस्या

CD

निवडणुक पानासाठी

प्रभागाचे अंतरंग - ५

अरुंद रस्ते, अपुऱ्या गटारांसह विविध समस्या
प्रभाग पाचमधील स्थिती ः प्रश्न मार्गी लावणाऱ्यांकडे असणार मतदारांचा कल
प्रशांत हिंदळेकर : सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २४ ः शहरातील विविध भागात जाणारे मुख्य रस्ते प्रभाग क्रमांक पाचमधून जातात. अरुंद व खड्डेमय रस्ते, पालिकेचे वाहनतळ असतानाही त्याचा नियोजनाअभावी होत नसलेला वापर, गटार व सांडपाणी अशा विविध समस्यांनी या प्रभागातील नागरिकांना ग्रासले आहे. पालिकेच्या निवडणुकीत या प्रभागात ठाकरे शिवसेना व भाजप यांच्यातच तुल्यबळ लढत होणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या प्रभागात कोण बाजी मारतो? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
शहरातील मध्यवर्तीचा भाग हा प्रभाग क्रमांक पाचमध्ये आहे. शहरातील विविध प्रभागात जाणारे मुख्य रस्ते हे याच प्रभागातून जातात. मालवण शहर पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे शहरात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत असतात. मात्र, या प्रभागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. अनेक रस्ते हे अरुंद असल्याने अनेक समस्या भेडसावत आहेत. मुख्य रस्त्याचे रुंदीकरण व्हावे, अशी बऱ्याच वर्षाची मागणी आहे. मात्र, दाट लोकवस्तीमुळे रस्त्यांच्या रुंदीकरणाचा प्रश्न रखडला आहे. याच प्रभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाचा मुख्य रस्ता आहे. मात्र, दुतर्फा गटाराची व्यवस्था नसल्याने पावसात पाणी साचण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे रस्त्याचीही दुरवस्था होत आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा गटार व्यवस्था करण्याची गरज आहे.
शहरातील भरड हा मुख्य भाग या प्रभागात मोडतो. या भागात पालिकेच्या माध्यमातून पर्यटकांसाठी वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, त्याचे योग्य नियोजन झालेले नाही. वाहनतळाची माहिती देणारे फलक नसल्याने शहरात दाखल होणाऱ्या पर्यटकांना या वाहनतळाची माहितीच नाही. परिणामी पर्यटक आपली वाहने रस्त्यालगत उभी करून ठेवत असल्याने याठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष देत वाहनतळाचे योग्य नियोजन करायला हवे अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.
शहरात दाखल होण्यासाठी व बाहेर पडणाऱ्या रस्त्यावर एक दिशा मार्गाचे ठळक फलक बसविण्याची कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे पर्यटकांची मोठी गैरसोय होते. याचा विचार करता एक दिशा मार्गदर्शक फलक बसविण्याची कार्यवाही होण्याची गरज आहे. या प्रभागात पर्यटन स्थळे नसली तरी हॉटेल्स, निवास व्यवस्थेची सुविधा, लॉजिंग आहेत. या व्यावसायिकांना सांडपाणी विल्हेवाटीची समस्या प्रामुख्याने भेडसावत आहे. भुयारी गटार योजनेचे काम झाले असले तरीही ही योजना प्रत्यक्षात सुरू झालेली नाही. त्यामुळे सांडपाणी विल्हेवाट प्रश्न कायमस्वरूपी दूर करण्याचे नियोजन व्हायला हवे, अशी स्थानिकांची मागणी आहे.
या प्रभागात भाजपकडून माजी नगरसेवक यतीन खोत, महानंदा खानोलकर, ठाकरे शिवसेनेकडून महेंद्र म्हाडगुत, काँग्रेसकडून अमृता मोंडकर, शिंदे शिवसेनेकडून विलास मुणगेकर, नंदिता वरवडेकर या निवडणूक रिंगणात आहेत. या प्रभागातील सद्यस्थितीचा विचार करता ठाकरे शिवसेना व भाजप यांच्यातच चुरशीची लढत होणार असल्याचे चित्र आहे. भाजपचे माजी नगरसेवक यतीन खोत यांचे या प्रभागात वर्चस्व आहे. प्रभागातील अनेक विकासात्मक कामे त्यांनी मार्गी लावली आहेत. त्यांचा प्रभागात चांगला जनसंपर्क आहे. त्यामुळे यावेळी प्रभागातील जनतेचा पाठींबा आपल्याला मिळेल असा विश्वास त्यांना आहे. त्यांच्या विरोधात ठाकरे शिवसेनेकडून महेंद्र म्हाडगुत यांना उमेदवारी देत खोत यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे.
मागील निवडणुकीत हे दोन्ही उमेदवार एकमेकांसमोर उभे होते. यात यतीन खोत यांनी बाजी मारली होती. मात्र, यावेळी महायुती न झाल्याने मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा ठाकरे शिवसेनेचे उमेदवार म्हाडगुत यांना होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यादृष्टीने त्यांनी प्रभागात प्रचार यंत्रणा राबविण्यावर भर दिला आहे. त्यामुळे ते आव्हान देत मतदारांना आकर्षित करण्यासाठी कोणते प्रभावी मुद्दे मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. याच प्रभागातुन माजी नगरसेवक राहिलेले विलास मुणगेकर, महानंदा खानोलकर या ज्येष्ठ नगरसेविका आपले नशीब पुन्हा आजमावत आहेत. त्यांनीही प्रभावी प्रचार करण्यावर भर दिला आहे. स्थानिक मतदारांचा त्यांना कसा प्रतिसाद मिळतो? यावर त्याचे भवितव्य अवलंबून असेल. अमृता मोंडकर, नंदिता वरवडेकर हे नवीन चेहरेही या निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत. त्यांनाही मतदारांचा कसा मिळतो हे पहावयास मिळणार आहे.

चौकट
अशी आहे रचना
प्रभाग क्रमांक पाचची लोकसंख्या १८०४ एवढी आहे. या प्रभागात मामा वरेरकर नाट्यगृह, भरड नाका, कुडाळकर हायस्कूल, गायकवाड घर ते हडकर घर तेथून राजन सरमळकर घरापासून अथर्व कॉम्प्लेक्स खांडाळेकर तिठा तेथून नागेश्वर पार्क कॉम्प्लेक्स रेवतळे रस्ता भुताचा आंबा तेथून राज्यमार्ग १८२ कुडाळकर हायस्कूल भरड नाका ते मामा वरेरकर नाट्यगृह ते फोवकांडा पिंपळ, फोवकांडा पिंपळ ते साई मंदिर रस्ता देऊलकर घर ते खटावकर घर कोळंब रस्ता या भागाचा समावेश आहे. या प्रभागात ६५६ पुरुष तर ६९८ महिला मतदारांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Female News Anchor Suicide : खळबळजनक! महिला न्यूज अँकरची चॅनलच्या ऑफिसमध्येच गळफास लावून आत्महत्या

Smriti - Palash Wedding: 'स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृतीमुळे...', भाऊ पलाशचं लग्न लांबणीवर पडल्यानंतर पलक मुच्छलची पोस्ट

Sunidhi Chauhan Concert : ‘देसी गर्ल’च्या मैफिलीची उत्सुकता; ‘स्वास्थ्यम्’ मध्ये ६ डिसेंबरला ‘सुनिधी चौहान कॉन्सर्ट’!

Palghar News : मोखाड्यात प्रसुत मातेची बाळाला घेऊन जंगलातुन २ किलोमीटर पायपीट; रूग्णवाहीका चालकाने अर्ध्यावरच सोडल्याने ओढवला प्रसंग!

Latest Marathi News Live Update : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT