कोकण

दापोली-दूध उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत योजना पोचवा

CD

rat24p23.jpg-
06460
दापोली ः दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना राज्यमंत्री योगेश कदम.
------------
दूध उत्पादकांपर्यंत योजना पोचवा
राज्यमंत्री कदम : दापोली शेतकऱ्यांचा मेळावा
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. २५ ः शासनाच्या विकास योजना प्रत्येक दूध उत्पादक शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यमंत्री योगेश कदम यांनी दापोलीतील जाहीर मेळाव्यात केले.
दापोली-मंडणगड-खेड भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा दापोली येथे झाला. त्या वेळी ते बोलत होते. राज्यमंत्री कदम म्हणाले, ‘शेतकरी आणि शासन या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, योग्य ताळमेळ साधला तरच शेती व पशुपालन क्षेत्र सक्षम होईल. जिल्ह्यात तरुण पिढी मोठ्या संख्येने दूध व्यवसायाकडे वळत आहे, ही समाधानकारक बाब आहे, मात्र, सर्व संबंधित शासकीय योजना प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांचा लाभ मिळणे अत्यावश्यक आहे.’
भौगोलिक आणि पायाभूत विकास होत असताना दूध उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाला पाहिजे, यावर भर देत कदम यांनी फार्मर प्रोड्युसर कंपनीची तत्काळ स्थापना करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. या माध्यमातून शेतकऱ्यांची बाजारपेठेपर्यंतचे पोहोच, दरातील पारदर्शकता आणि उत्पादनक्षमता वाढेल, असा विश्वास योगेश कदम यांनी व्यक्त केला.यावेळी दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! एप्रिलमध्ये ‘या’ महिलांनाच मिळणार ३००० रुपये, ‘ई-केवायसी’ न केलेल्या महिलांचा बंद होणार लाभ, वाचा...

उज्ज्वला योजनेच्या महिलांच्या डोळ्यात धूर! ऑनलाइन बुकिंगसाठी ४५ दिवसांची अट; अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय, पण अंमलबजावणी कागदावरच, वाचा...

Paneer Jowar Paratha: उन्हाळ्यात हलका पण पौष्टिक नाश्ता हवा असेल तर घरच्या घरी बनवा स्वादिष्ट पनीर ज्वारी पराठा

अग्रलेख : भारत- चीन व्यापाराचा नवा अध्याय

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १४ मार्च २०२६ ते २० मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT