rat२४p१६.jpg-
25O06412
रत्नागिरी- महायुतीच्या प्रचारसभेत बोलताना शिवसेनेचे उपनेते उदय सामंत. सोबत अॅड. दीपक पटवर्धन, राहुल पंडित, बंड्या साळवी, राजन शेट्ये, शिल्पा सुर्वे, प्रिती सुर्वे आदी.
----
माझी डमी वापरून विरोधकांचे राजकारण
उदय सामंत ः महाविकास आघाडीत खिलाडूवृत्तीचा अभाव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : महाविकास आघाडीतील विरोधकांमध्ये खिलाडू वृत्ती नाही. विकासकामाच्या जोरावर आणि जनसंपर्कावर निवडणूक लढली पाहिजे; परंतु विरोधक माझ्यासारख्या दिसणाऱ्या डमी व्यक्तीचा स्टेटस ठेवून प्रचारासाठी फिरवत आहेत. माझ्या डमीचा आधार घेऊन हे घाणेरडे राजकारण दुर्दैवी आहे, अशी टीका शिवसेनेचे उपनेते उदय सामंत यांनी केली. शहरातील प्रभाग १, ३ आणि ५ येथील महायुतीच्या जाहीर प्रचारात ते बोलत होते.
उदय सामंत म्हणाले, रत्नागिरी शहरातल्या मुलांना रोजगारासाठी कुठेही जाऊ नये यासाठी परटवणे येथून तीन किलोमीटर अंतरावर मोठा सेमीकंडक्टरचा प्रकल्प होत आहे. वाटद येथे संरक्षणदलाचा बंदुका बनवणारा मोठा प्रकल्प होत आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे तालुक्यातील अनेक बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. साठ ते सत्तर टक्के प्रभागात विरोधकांची अनामत रक्कम जप्त होईल, अशी चांगली राजकीय परिस्थिती सर्व प्रभागांमध्ये आहे. विकासाच्या जोरावर आपला विजय निश्चित असला तरी गाफील राहू नका.
१९९९ पासून माझी राजकीय सुरुवात झाली; परंतु त्याच्या अगोदरपासून रत्नागिरी नगरपालिकेमध्ये कार्यरत असलेले राजन शेट्ये आज पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांची ही आठवी निवडणूक आहे. राजन शेट्ये यांच्याकडे बघितल्यानंतर आमच्यामध्ये देखील काम करण्याची ऊर्जा निर्माण होते. त्यांचा प्रभागात दांडगा संपर्क आहे.
---
चौकट
दादागिरी खपवून घेणार नाही ...
काहीजणांना मी शिवसेनेचे पद देण्याचे नगरसेवक करण्याचे आश्वासन दिले होते; पण दादागिरी करून जर कोणी पद मिळवण्याचा प्रयत्न करत असेल तर माझ्यासारखा वाईट पालकमंत्री दुसरा नाही. या जिल्ह्यात कायद्याचे आणि पोलिसांचे शासन चालते. कोण काय करतंय, कोण एमडी आणतंय, कोण गांजा आणतंय, या गोष्टी माझ्या कानावर आहेत. मला खोलात जायला लावू नका अन्यथा पोलिस अशी कारवाई करतील की, भविष्यात निवडणूक लढवायचे स्वप्नही पाहता येणार नाही, असा दम उदय सामंत यांनी दादागिरी करणाऱ्या काहींना भरला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.