विचार जागे होण्यासाठी संमेलने आवश्यक
डॉ. राजन गवस ; जिल्हा साहित्य संमेलनाचा समारोप
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ ः लेखकाने लिहिते असायला हवे तरच समाज विकसित, गतिमान, प्रवाही होणार आहे. साचलेपण आले की, विचारांची गती खुंटते. त्यामुळे एकमेकांशी संवादित राहण्यासाठी, समृद्ध होण्यासाठी, माणसाचे किमान विचार जागे होण्यासाठी अशी संमेलने होणे गरजेचे आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनाचे डॉ. राजन गवस यांनी केले.
महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ (मुंबई) आणि नवनिर्माण शिक्षणसंस्था यांच्यावतीने शनिवारी (ता. २२) आयोजित रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनाच्या समारोपावेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर संमेलनाचे स्वागताध्यक्ष अभिजित हेगशेट्ये आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य भरत गावडे उपस्थित होते. डॉ. गवस म्हणाले, जाणिवा निर्माण झाल्या की, त्यांची मशागत होते आणि त्यातून नवनिर्माण होते. त्यासाठी विचारांची घुसळण होणे आवश्यक आहे आणि त्याकरिता विचारांची आंदोलने वाहती ठेवणे गरजेचे आहे. कितीही त्वेषाची रानं तयार केली तरी त्यावर माणसाचे संगोपन होत नाही. ते प्रेमावर होते. लेखक प्रत्येकाला विचार करायला भाग पाडतो.
आज दिवसभरात विविध परिसंवादाला विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती हे नवनिर्माणचे यश आहे, असे नमूद करतानाच संमेलनातून साहित्य निर्माण व्हावे आणि त्यातून साहित्य संमेलने व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.