कोकण

कथाकथन, अभिनय स्पर्धेस ''मदर क्विन्स''मध्ये प्रतिसाद

CD

swt2510.jpg
06560
सावंतवाडीः एकपात्री अभिनय स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध पात्रे सादर केली.

कथाकथन, अभिनय स्पर्धेस
‘मदर क्विन्स’मध्ये प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ः सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित येथील मदर क्विन्स इंग्लिश स्कूल प्रशालेत शनिवारी (ता. ११) पहिली ते चौथी या वर्गांसाठी कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये एकूण ६७ विद्यार्थी सहभागी झाले. सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहात व आत्मविश्वासाने कथाकथन सादर केले.
पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी एकपात्री अभिनय स्पर्धा घेण्यात आली. यावेळी दिलेल्या विषयांवर सहभागी १६ स्पर्धकांनी उत्कृष्ट एकपात्री अभिनय सादर केला. स्पर्धेचे परीक्षक समर्थ गवंडी यांनी सर्व विद्यार्थ्यांना अभिनयातील बारकावे व आवाजाच्या वापराबद्दल मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी दशावतारातील ‘बिलिमारो’ हे पात्र आपल्या दर्जेदार अभिनयाने रंगमंचावर उत्कृष्टपणे वठवून उपस्थित सर्व विद्यार्थी व प्रेक्षकांची मने जिंकली. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल मंडळाचे अध्यक्ष खेमसावंत भोसले, चेअरमन शुभदादेवी भोसले, कार्यकारी विश्वस्त लखमराजे भोसले, विश्वस्त श्रद्धाराजे भोसले, संचालक दिलीप देसाई, सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, सदस्य जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, मुख्याध्यापिका अनुजा साळगावकर, प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक-शिक्षक संघ, कार्यकारी समिती सदस्य यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atrocity Act: मोठी बातमी! अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या अंमलबजावणीत बदल; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, नवा नियम काय?

मध्यप्रदेशच्या तीन विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात दिली १० वीची परीक्षा; केंद्र संचालकाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

Pune News : शनिवारवाडा पुन्हा सात मजली करा; आमदार हेमंत रासने यांची मागणी

Mumbai Local: महिला प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार; सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम

Beed Crime: परळीत अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; दोन नराधमांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT