swt252.jpg
06561
वालावलः विद्यालयाच्या ‘वेटलँड मैत्री क्लब’मार्फत लक्ष्मीनारायण मंदिर तलाव परिसरात पर्यावरणीय जागृती व स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेले क्लबचे विद्यार्थी व मार्गदर्शक.
वालावल तलाव परिसर झाला चकाचक
स्वच्छता मोहिमेस प्रतिसादः ‘वेटलँड मैत्री क्लब’च्या विद्यार्थ्यांचे श्रमदान
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २५ ः नर्मदाबाई अनंत शिवाजी देसाई विद्यालय वालावल (ता .कुडाळ), संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ व महाराष्ट्र शासन जैवविविधता बोर्ड यांच्यावतीने वालावल विद्यालयात स्थापन करण्यात आलेल्या ‘वेटलँड मैत्री क्लब’मार्फत श्री देव लक्ष्मीनारायण मंदिर वालावल तलाव किनाऱ्यावर विशेष पर्यावरणीय जागृतीपर कृती मोहीम राबविण्यात आली.
पाणथळ जागांचे संरक्षण संवर्धन व्हावे तसेच पर्यावरणात्मक जाणीव जागृती निर्माण व्हावी, या अनुषंगाने संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. योगेश कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली वालावल हायस्कूलमध्ये वेटलँड मैत्री क्लब स्थापन केला आहे. या अनुषंगाने पाणथळ जागा म्हणजे काय, पाणथळ जागांचे महत्त्व, संरक्षण याबाबत संशोधिका साक्षी चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या विद्यार्थ्यांची लक्ष्मीनारायण मंदिर येथील तलावाच्या ठिकाणी दुपारनंतरच्या सत्रात क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली.
क्षेत्र भेटीमध्ये तलावाचे प्रत्यक्ष निरीक्षण, विचार मंथन व प्रत्यक्ष कृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तलावातील पाणी प्रदूषित करणारा वेगवेगळ्या प्रकारचा कचरा विद्यार्थ्यांनी गटवार गोळा केला. पर्यावरणीय सजगता निर्माण व्हावे, या उद्देशाने कचऱ्याचे रीतसर वर्गीकरणही करण्यात आले. यावेळी संशोधिका मयुरी चव्हाण, साक्षी चव्हाण, राष्ट्रीय हरित सेनेचे मार्गदर्शक भाग्यविधाता वारंग व विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.