- rat२५p५.jpg-
P२५O०६५३५
रत्नागिरी ः गहाळ झालेले मोबाईल परत घेताना उपस्थित नागरिक व पोलिस अधिकारी.
---
गहाळ झालेले १८७ मोबाईल परत
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ ः जिल्ह्यातील नागरिकांचे हरवलेले १८७ मोबाईल कोकण परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या हस्ते परत करण्यात आले.
जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे तसेच अप्पर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या सूचनेनुसार, मार्च ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत जिल्ह्यातील नागरिकांच्या गहाळ झालेल्या मोबाइलची माहिती सायबर पोलिस ठाणे रत्नागिरीच्या पोलिस निरीक्षक स्मिता सुतार, पोलिस शिपाई अजिंक्य ढमढेरे यांनी तसेच जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्याचे अंमलदार यांनी एकत्रित काम करून मोबाईलचा शोध घेतला. या प्रक्रियेत १८७ मोबाईल शोधण्यास पोलिसदलाला यश आले. हे मोबाईल विशेष पोलिस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्राचे संजय दराडे यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आले तसेच सायबर क्राईमसारख्या गुन्ह्याला बळी पडलेल्या व्यक्तीने तत्काळ जवळच्या पोलिस ठाण्याकडे संपर्क साधण्याचे त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश कदम व पोलिस अधिकारी, अंमलदार उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.