कोकण

निवडणुक पानासाठी दोन बातम्या राजन तेली-लखमराजे भोसले

CD

swt2515.jpg
06611
कणकवली ः येथील पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेना नेते राजन तेली. बाजूला सतीश सावंत, संजय आंग्रे.

सिंधुदुर्गचे पालकत्‍व निलेश राणेंना द्यावे
कार्यकर्त्यांचा आग्रह ः राजन तेलींची पत्रकार परिषदेत माहिती
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २५ ः सध्याच्या मंत्र्यांचा कार्यकाळ संपल्‍यानंतर नवीन आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांना मंत्री करावे तसेच त्‍यांच्याकडे सिंधुदुर्गचे पालकत्‍व द्यावे, अशी मागणी सर्व शिवसेना कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असल्‍याची माहिती माजी आमदार आणि शिवसेना नेते राजन तेली यांनी आज येथे दिली.
येथील आपल्‍या निवासस्थानी श्री. तेली यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभा संघटक सतीश सावंत, शिंदे शिवसेनेचे उपनेते संजय आग्रे आदी उपस्थित होते.
श्री. तेली म्‍हणाले, "नुकतेच सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंत्रिमंडळातील फेरबदलाबाबत सूचक विधान केले आहे. यात काही मंत्र्यांना आश्‍वासन दिल्‍याप्रमाणे त्‍यांचा मंत्रीपदाचा कालावधी संपल्‍यानंतर नव्या चेहऱ्यांना राज्‍य मंत्रिमंडळात सामावून घेतले जाणार आहे. यात सिंधुदुर्गातून दीपक केसरकर आणि निलेश राणे यांची नावे आहेत. यात आम्‍ही सिंधुदुर्गातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निलेश राणे मंत्री व्हावेत, अशी मागणी केली आहे. तसेच त्‍यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली जावी, अशीही मागणी आहे."
ते पुढे म्‍हणाले, "राज्‍याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आहे तर पालकमंत्री म्‍हणून निलेश राणे यांच्याकडे जबाबदारी दिली तर सिंधुदुर्गातील सर्व नगरपालिका, नगरपंचायतींसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्‍ध होणार आहे. या माध्यमातून सिंधुदुर्गाचा विकास वेगाने होणार आहे. नागरी सुविधांमध्येही भर पडणार आहे."
---------------
चौकट
यंदा परिवर्तन होणार ः सावंत
आमदार निलेश राणे यांनी कणकवलीची जबाबदारी घेतली आहे. लवकरच ते कणकवलीचा विकास आराखडा जाहीर करतील. शहराच्या सर्व प्रभागात त्‍यांना वाढता पाठिंबा मिळत आहे. त्‍यामुळे कणकवलीत यंदा परिवर्तन होणार. नगराध्यक्षासह सर्वाधिक नगरसेवक हे आघाडीचे निवडून येणार आहेत, असे सतीश सावंत यावेळी म्‍हणाले.
-----------------
swt2516.jpg
06612
सावंतवाडी ः येथे जाहीर सभेत बोलताना लखमराजे भोसले.

आम्हाला सावंतवाडीकरांची सेवा करायचीयं
लखमराजे भोसले ः समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ ः येथील जनकल्याणासाठी आम्ही राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुंदरवाडी खेमसावंत यांनी वसवली‌. ३५० वर्षांचा इतिहास या शहराला आहे. मोती तलाव, राजवाडा लोकांचा आहे. या सर्व ऐतिहासिक वास्तू व शहर हे सावंतवाडीकरांचेच राहील. आम्हाला फक्त सावंतवाडीकरांची सेवा करायची आहे, आम्ही सामान्य घराण्यासारखेच आहोत. तुमच्यासाठी २४ तास उपलब्ध असणार असून तुमच्या दारात देखील सेवेसाठी थांबणार आहोत. तुमच्या अडचणी आमच्या अडचणी आहेत. त्या सोडविण्यासाठी आम्ही तत्पर राहणार आहोत. त्यामुळे भाजपच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन लखमराजे भोसले यांनी केले.
येथील पालिका निवडणूक प्रचारार्थ गांधी चौकात जाहीर सभा आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. श्रद्धाराजे भोसले, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले, विशाल परब, शहर अध्यक्ष तथा उमेदवार सुधीर आडीवरेकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक ॲड. परिमल नाईक, उदय नाईक, आनंद नेवगी, मनोज नाईक, राजू बेग, ॲड. अनिल निरवडेकर, ॲड. ऋजूल पाटणकर, गोपाळ नाईक, प्रतिक बांदेकर, मोहिनी मडगांवकर, अमित गवंडळकर, दीपाली भालेकर, मेघा डुबळे, समृद्धी विर्नोडकर, ॲड. संजू शिरोडकर, दादू कविटकर, संध्या तेरसे, निलम नाईक, सुकन्या टोपले, सुनिता पेडणेकर, दुलारी रांगणेकर, महेशर शेख, वीणा जाधव यांच्यासह पदाधिकारी आदी उपस्थित होते.
श्री. लखमराजे पुढे म्हणाले, "आरोग्य, ड्रेनेज सिस्टीमसह इतर सुविधा राजघराण्याच्या काळात झाल्या. मात्र, नंतर त्यावर तेवढं लक्ष दिलं गेलं नाही. आज आमच्या माध्यमातून व पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून ती संधी आम्हाला मिळत आहे‌. आरोग्य सेवा व ड्रेनेजची समस्या आम्ही १०० टक्के सोडवणार आहोत. त्या काळात राजघराण्यान हे काम केले.‌ युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले या सामान्य घराण्यातील आहेत. मात्र, त्यांचा विवाह राजघराण्याशी झाला. त्यांनाही सामान्यांच्या प्रश्नांची जाण आहे. राजमाता, राणी हा मान जनतेनं आम्हाला दिला. जमीन, पैसा येईल-जाईल; पण लोक कायम सोबत राहतात. शिवरामराजे भोसले यांचा वारसा आम्ही चालवत आहोत. मधल्या पिढीने सामाजिक, शैक्षणिक कार्य केलं. अनेक जमीनी दिल्या आहेत. आजही जमीनी द्यायला तयार आहोत. लोकांसाठी काम करण्याचा आमचा हेतू आहे. राजघराणं सदैव लोकांसाठी त्यांची सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहे."
ते पुढे म्हणाले, " (कै.) बापूसाहेब महाराजांनी संस्थानाची ही सुंदरवाडी पालिकेच्या रुपाने शासनाकडे दिली. हे राजघराणं व ही पदं ही जनतेने दिलेली आहेत. आम्ही राजघराण्याने दिलेले योगदान व सेवा पाहूनच जनतेने आम्हाला हे राजपद बहाल केलेलं आहे. याच संस्थानकालीन राज घराण्याने या शहराची ड्रेनेज सिस्टीम असो वा पाणी पुरवठा योजना त्या काळात सुरू केल्यात आम्हाला आता सत्तेच्या माध्यमातून त्याचं संवर्धन करायचं आहे."
-------------
चौकट
ऐतिहासिक वास्तू सावंतवाडीकरांच्याच
आजही या शहरातील ऐतिहासिक मोती तलाव असो वा अन्य ऐतिहासिक वास्तू यांचं जतन व संरक्षण करण्याचं काम आम्ही राजघराणं म्हणून करत आहोत. मात्र, असं असलं तरीही मोती तलाव असो वा इतर ऐतिहासिक वास्तू या सावंतवाडीकरांच्याच आहेत व त्यांच्याच आहेत व राहतील, असेही श्री. लखमराजे म्हणाले.
-------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख - नक्षलमुक्तीच्या दिशेने

मोठी बातमी! राज्यात होणार १८००० कंत्राटी शिक्षकांची भरती; जिल्हा परिषदेच्या १० पेक्षा कमी पटाच्या शाळांसाठी निर्णय; माध्यमिक शाळांसाठी ‘हा’ निर्णय

आजचे राशिभविष्य - 26 नोव्हेंबर 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 26 नोव्हेंबर 2025

समस्येची उकल करताना...!

SCROLL FOR NEXT