कोकण

तीस वर्षे कुठेही हलणार नाही

CD

rat२५p७.jpg
P२५O०६५४३
पणदेरी: पणदेरी धरण दुरुस्ती भूमीपूजन कार्यक्रमात बोलताना राज्यमंत्री योगेश कदम.

अजून तीस वर्षे कुठेही हलणार नाही
योगेश कदम ः इशारा विरोधकांना की मित्रपक्षांना?
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता.२५ ः ‘मी इथून तीस वर्षे हलत नाही. दापोली मतदार संघाचा विकास पूर्ण होईपर्यंत माझी जागा अढळ आहे,’ असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केले.
मंडणगड तालुक्यातील पणदेरी धरणाच्या दुरुस्ती व मजबुतीकरण कामाच्या रविवारी (ता. २३) झालेल्या भूमीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. दापोली मतदार संघातील सत्ता समीकरणांमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे दापोलीतील आगामी राजकीय घडामोडींना नवा वेग मिळणार आहे. राज्यमंत्री कदम यांनी पणदेरी येथे केलेले विधान केवळ भाषणातील जोर नाही तर विकासाच्या आधारावर मतदार संघात दीर्घकालीन पकड मजबूत करण्याची राजकीय घोषणा असल्याची चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपचे मित्रपक्ष तसेच काँग्रेस व उबाठा गट या सर्वांना उद्देशून हा स्पष्ट संदेश दिला आहे की, अशी चर्चाही रंगलेली आहे. दापोली विधानसभा मतदार संघातील काही भागांत विरोधकांनी गेल्या काही महिन्यांत केलेल्या हालचाली, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे संकेत आणि स्थानिक पातळीवरील नाराजी या पार्श्वभूमीवर कदम यांची तीस वर्षांची अढळता ही घोषणा एक प्रकारे शक्तिप्रदर्शनच आहे, असे निकटवर्तीयांनी सांगितले.
दरम्यान, मंत्री कदम यांनी भाषणात पणदेरी धरण प्रकल्पाच्या गतीकरणासह दापोली, मंडणगड, खेड परिसरातील पायाभूत सुविधा, जलसंपत्ती आणि शेतीविकास प्रकल्पांना दिलेली प्राधान्यक्रमाची माहितीही दिली. ते म्हणाले, राजकारणासाठी नव्हे तर दापोलीच्या सर्वांगीण विकासासाठी मी इथे आहे. अधांतरी राहिलेली कामे पूर्ण करेपर्यंत माझे लक्ष्य एकच विकास आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्लांच्या थेट डोक्याला लावली बंदूक, Z+ सुरक्षा असतानाही घटना; २० वर्षांपासून रचत होता कट

Solapur News: साेलापूरातील ‘त्या’ सात ग्रामसेवकांवर होणार निलंबनाची कारवाई; मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम घेणार निर्णय!

Global Oil Shortage Reasons : सर्वांत मोठा तेलसाठा खुला होणार! ऊर्जासंस्था देणार 40 कोटी बॅरल; वाचा काय आहे 'आयईए'चा प्लॅन?

Farooq Abdullah Attack : फारूख अब्दुल्लांवर हल्ला करणारा कमल सिंग कोण आहे, कशामुळे झाडली गोळी ? सांगितले धक्कादायक कारण

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये शनिवारी हिंदूहित रक्षा मेळावा; मंत्री नीतेश राणे मार्गदर्शन करणार

SCROLL FOR NEXT