कोकण

रत्नागिरी-प्रिंदावणेत 77, कुंभवडेत 63 जणांच्या तपासण्या

CD

प्रिंदावणेत ७७, कुंभवडेत ६३ जणांच्या तपासण्या
टीबीमुक्त भारत अभियान; लक्षणे आढळल्यास तपासणी करा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ ः टीबीमुक्त भारत अभियानांतर्गत कुंभवडे पीएससी कार्यक्षेत्रात व्यापक तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. त्यात प्रिंदावण येथील ७७ जणांचे तर कुंभवडे प्राथमिक आरोग्यकेंद्रात ६३ एक्स-रे व संबंधित टीबी तपासण्या करण्यात आल्या आहेत.
अतिदुर्गम भागात घेण्यात आलेल्या या तपासणी मोहिमेला जिल्हास्तरावरून तसेच स्थानिक स्तरावरून उत्तम प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात आरोग्य पर्यवेक्षक मंगेश पाटील, वैद्यकीय अधिकारी दिगंबर चौरे, कुंभवडे, डॉ. शिंदे, आरोग्य सहाय्यक लांघी, समुदाय आरोग्य अधिकारी वनवे, आरोग्य सहायिक मदने, आरोग्य सहाय्यक कांबळे यांच्यासह प्राथमिक केंद्रातील सर्व आरोग्यसेवक, सेविका, गटप्रवर्तक, आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी सेविका यांचा सहभाग होता. या संपूर्ण मोहिमेसाठी जिल्हास्तरावरून जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या सूचनेनुसार शिबिरात तपासणी झालेल्या सर्व रुग्णांची निक्षय पोर्टलवर १०० टक्के नोंदणी करण्यात येत असून, संबंधित सर्व तपासण्या तत्काळ भरण्याचे काम सुरू आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे टीबीमुक्त भारत अभियानाला गावपातळीवर बळकटी मिळत असून, लवकर निदान–लवकर उपचार या धोरणालाही गती मिळत आहे. टीबीची लक्षणे आढळल्यास तत्काळ जवळच्या आरोग्यकेंद्रात तपासणी करून घ्यावी, असे आवाहन डॉ. महेंद्र गावडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई स्टेशनवर अश्लील इशारे; तरुणीकडून विकृत व्यक्तीला चोप, व्हिडिओ व्हायरल

Gautam Gambhir: 'गॅरी कर्स्टन बनायला आला अन् चॅपेल बनला...' भारताला व्हाईटवॉश मिळाल्यानंतर गंभीर ट्रोल; मीम्सही व्हायरल

"सुकन्याची ऑडिशन पाहून मी.." रेणुका यांनी सांगितली खास आठवण ; म्हणाल्या...

'कंडोम खरेदी करण्यासाठी लोक लाजतात' काजोल आणि सोनाक्षीचं बोल्ड वक्तव्य चर्चेत, म्हणाल्या...'म्हणूनच एवढी लोकसंख्या...'

Latest Marathi News Live Update : पुण्यातील महिलेने केला पुरुषावर अत्याचार

SCROLL FOR NEXT