06733
‘पणदूर’ संघाकडून सांगलीचा पराभव
शूटिंग बॉल स्पर्धा; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २६ ः शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय, पणदूर या प्रशालेच्या १० वर्षे मुलगे या वयोगटातील मुलांनी शूटिंग बॉल स्पर्धेत सांगलीच्या संघावर थरारक विजय मिळवत कोल्हापूर विभागातून राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी मानकरी होण्याचा बहुमान मिळविला.
वेताळबांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय, गुरुवर्य (कै.) शशिकांत अणावकर विद्यानगरी पणदूर तिठा येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित विभागीय शालेय शूटिंग बॉल क्रीडा स्पर्धा झाली.
या कोल्हापूर विभागीय स्तरावरील शूटिंग बॉल क्रीडा स्पर्धेसाठी १७ व १९ वर्षांखालील मुले व मुलींचे संघ सहभागी झाले. यात मुलांचे १६ संघ व मुलींचे १६ संघ असे एकूण ३२ संघ सहभागी झाले. यामध्ये शिवाजी इंग्लिश स्कूलच्या १९ वर्षे मुलगे या वयोगटातील खेळाडूंनी सांगली संघावर थरारक विजय मिळवून कोल्हापूर विभागातून राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी मानकरी ठरले.
स्पर्धेचे उद्घाटन संस्था चेअरमन आपासाहेब गावडे यांच्या विशेष उपस्थितीत झाले. संस्था उपाध्यक्ष प्रकाश जैतापकर, सचिव नागेंद्र परब, संचालक रवींद्र कांदळकर, डॉ. अरुण गोडकर, सुबीकाका अणावकर, रिना सावंत, एम. एस. पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ, राज्य क्रीडा मार्गदर्शक माधुरी घराळ, प्रभारी मुख्याध्यापक मिलिंद कर्पे, पंच म्हणून गोवा येथील राज्याचे आंतरराष्ट्रीय पंच सुनील गावडे, दिलीप गावडे, त्रिंबक हायस्कूलचे संस्थापक अण्णा सपकाळ, महेंद्र वारंग, आचरा हायस्कूलचे श्री. मुळीक यांनी कामकाज पाहिले. सहायक शिक्षक वालावलकर यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.