कोकण

मसुरे गावडे पुरुष जत्रोत्सव शनिवारी

CD

मसुरे गावडे पुरुष
जत्रोत्सव शनिवारी
मसुरे ः मसुरे-खाजणवाडी येथील श्री देव गावडे पुरुष मंदिर येथे वार्षिक जत्रोत्सव शनिवारी (ता. २९) होत आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शनिवारी सकाळी ९ वाजता श्री गणेश पूजा व श्री देव गावडे पुरुष पूजन, दुपारी साडेबाराला महाप्रसाद, ३ वाजता लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, सायंकाळी ५ वाजता श्री देव गावडे पुरुषाकडे श्रीफळ ठेवून गार्‍हाणे व श्री चाळ्याकडे भक्ष्य देणे, रात्री ८ वाजता महाप्रसाद, ९ वाजता सार्वजनिक ओटी भरणे, १०.३० वाजता अवसारास साद, फटाक्यांच्या आतषबाजीत मंदिराभोवती प्रदक्षिणा, १२ वाजता दशावतार गणेशवंदना व त्यानंतर नाट्यप्रयोग, रविवारी (ता. ३०) सकाळी ७ वाजता अवसारास साद, दशावतारांच्या उपस्थितीत श्रीकृष्ण अवतारात दहिकाला (गाडगे फोडणे) कार्यक्रम, मंदिराभोवती प्रदक्षिणा असे कार्यक्रम होतील.
.......................
आरवली-देऊळवाडी
येथून दुचाकी चोरीस
वेंगुर्ले ः आरवली-देऊळवाडी येथे इलेक्ट्रिक साहित्य ठेवण्याच्या गोदोमाच्या ठिकाणी किरण जनार्दन पालयेकर यांनी हँडललॉक करून उभी केलेली दुचाकी (एमएच ०७ एडी ८६६१) अनोळखी चोरट्याने चोरून नेली. पालयेकर यांच्या फिर्यादीनुसार अनोळखी चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल प्रसाद कदम तपास करीत आहेत.
.......................
शिवडाव विद्यालयात
उद्या बक्षीस वितरण
कणकवली ः शिवडाव माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन शुक्रवारी (ता. २८) सकाळी दहाला आयोजित केला आहे. शिवडाव सेवा संघ, मुंबईचे अध्यक्ष मोहन पाताडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार असून यावेळी शिक्षक भारतीचे कार्यवाह संजय वेतुरेकर उपस्थित राहणार आहेत. विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याध्यापक मुकेश पवार, भाग्यरेखा दळवी, काशिराम गावकर आदींनी केले आहे.
--
कवठणीत उद्या
माऊली जत्रोत्सव
सावंतवाडी ः कवठणी येथील श्री माऊली देवीचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवारी (ता. २८) होणार आहे. यानिमित्त सकाळी पूजा, अभिषेक व विविध धार्मिक कार्यक्रम, ओट्या भरणे, भाविकांची गाऱ्हाणी होणार आहेत. रात्री अकराला पालखी प्रदक्षिणा व त्यानंतर आजगावकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन देवी माऊली देवस्थान कमिटीने केले आहे.
.....................
देवबागला मंगळवारी
विश्वेवर जत्रोत्सव
मालवण ः देवबाग डिंगेवाडी येथील विश्वेश्वर मंदिरचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवारी (ता. २) साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी धार्मिक विधी आणि रात्री श्री कलेश्वर नाट्यमंडळ, नेरुर (भाई कलिंगण) यांचा नाट्यप्रयोग होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन विश्वेश्वर देवस्थान मंडळ, डिंगेवाडी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US visa fraud case: अमेरिकेत दरोड्यांचं थरारक नाटक… पण CCTV ने उघड केली खेळी; व्हिसासाठी रचलेल्या कटात १० भारतीय अटकेत!

Purandar IT Park Plan : पुण्याच्या IT क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार! 572 हेक्टर जमिनीवर सरकारचा मोठा मास्टरप्लॅन, पुरंदरमध्येही IT पार्कसाठी सरकार सकारात्मक

Latest Marathi News Live Update : केंद्र सरकारचे लक्ष पुरवठा साखळीवर

पाकिस्तानी फलंदाजाच्या धावबादचा वाद! मोहम्मद कैफ बांगलादेशच्या कर्णधारावर भडकला, म्हणाला, हे चुकीचं

ELIMINATION: 'बिग बॉस मराठी ६' मधून 'या' स्पर्धकाचा पत्ता कट; या आठवड्यात घराबाहेर झाली अनेकांची आवडती व्यक्ती

SCROLL FOR NEXT