कोकण

कुडाळ इंग्रजी शाळेत ‘संविधान दिन’

CD

06772
कुडाळ ः क.म.शि.प्र. इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळेत संविधानावर आधारित भित्तिचित्रे प्रदर्शित करण्यात आली.

कुडाळ इंग्रजी शाळेत ‘संविधान दिन’
कुडाळ, ता. २६ ः येथील क.म.शि.प्र. इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संविधानावर आधारित भित्तिचित्रे प्रदर्शित करण्यात आली. विद्यार्थ्यांनी संविधानाची महत्त्वाची तत्वे चित्ररुपाने सादर केली. सर्वांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले. यानिमित्त संविधानाशी संबंधित सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला होता. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी आनंदाचे क्षण कैद केले. मानवी साखळी तयार करून विद्यार्थ्यांमध्ये नागरिकत्व, जबाबदारी, सहकार्य, सामाजिक संवेदनशीलता आणि लोकशाही मूल्ये दृढ करण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध कला साहित्य वापरून हस्तकला प्रदर्शन भरवण्यात आले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी बनविलेल्या मातीच्या वस्तू, करवंटीपासून तयार केलेल्या कलाकृती, पुष्पगुच्छ तसेच कापूस, टिकल्या व बांगड्यांपासून बनविलेल्या सजावटीच्या वस्तू, शुभेच्छा पत्रे अशा अनेक आकर्षक वस्तू ठेवण्यात आल्या. करवंटीपासून बनविलेल्या जहाजाने सर्वांचे लक्ष वेधले. विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीते सादर केली. हा कार्यक्रम मुख्याध्यापिका मुमताज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US reduces tariff for India : मोठी बातमी! अमेरिकेने भारतावरील टॅरीफ कमी केला; ट्रम्प यांची घोषणा

Manipur Government Formation : भाजपकडून मणिपूरमध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग!, 'NDA'चे सर्व आमदार दिल्लीत दाखल

Apple Valentine Offer : ‘अ‍ॅपल’ने लाँच केली ‘व्हॅलेंटाईन डे’ स्पेशल फेस्टिव्ह कॅशबॅक ऑफर!

Rohit Shetty Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळी झाडणारा अकोल्याचा; बिश्नोई टोळीच्या शुभम लोणकरने सोशल मीडियावर स्वीकारली जबाबदारी

Mohol Leopard News : मोहोळ शहरा नजीक आढळलेले बिबट्या सदृश्य प्राणी हे बिबटे नसून मार्जर कुळातील रान मांजर वनविभागाचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT