06782
‘राज्यस्तरीय कबड्डी’चा उद्यापासून थरार
पाट प्रशालेत पूर्वतयारी; क्रीडाप्रेमींसह विद्यार्थ्यांची उत्सुकता
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. २६ ः पाट हायस्कूलमध्ये राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेच्या भव्य आयोजनाची जय्यत तयारी सुरू आहे. ही स्पर्धा प्रशालेत २८, २९, ३० नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. शाळेच्या मैदानावर प्रेक्षक गॅलरी व मुख्य स्टेज बांधणी तसेच प्रशाला सुशोभीकरण या पूर्वतयारीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.
यामध्ये संस्था पदाधिकाऱ्यांसमवेत प्रशालेतील शिक्षक, माजी विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही अथक प्रयत्न सुरू आहेत. स्पर्धा सुरळीत व्हावी, यासाठी पदाधिकाऱ्यांकडून योग्य नियोजन केले जात आहे. त्यामुळे या स्पर्धेची उत्सुकता विद्यार्थी, ग्रामस्थ व सर्व क्रीडाप्रेमींना लागून राहिली आहे. राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे पुरस्कर्ते असे ः पुरुष गट प्रथम क्रमांक ५५ हजार (सचिन देसाई, परुळे), द्वितीय ४५ हजार (मिलिंद कोरडे, उद्योजक), तृतीय २५ हजार (कै. रेडकर गुरुजी, माजी कार्याध्यक्ष), चतुर्थ क्रमांक १५ हजार (दीपक पाटकर, संस्था खजिनदार), पुरुष गटातील सर्व आकर्षक चषक-चित्रांग साळगावकर, रोख पारितोषिके-सुनील म्हापणकर.
महिला गट प्रथम क्रमांक ३५ हजार, द्वितीय २५ हजार. तृतीय क्रमांक १५ हजार, चतुर्थ क्रमांक १० हजार (पुरस्कर्ते (कै.) गं. लता गोपाळ परुळेकर यांच्या स्मरणार्थ जीया परुळेकर पाट-मुंबई), महिला स्पर्धेचे सर्व चषक-भक्ती तेली कोचरेकर आणि रोख पारितोषिके सुनील म्हापणकर समरणार्थ दिली आहेत. संस्थाध्यक्ष दिगंबर सामंत, कार्याध्यक्ष देवदत्त साळगावकर, राजेश सामंत, सुधीर मळेकर, हिशोब तपासनीस शरद कोनकर, मुख्याध्यापक राजन हंजनकर, संदीप साळसकर, क्रीडा शिक्षक संजय पवार आदींनी पाहणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.