कोकण

‘ओंकार’प्रश्नी उद्यापासून बांद्यात ठिय्या आंदोलन

CD

06805

‘ओंकार’प्रश्नी आपासून बांद्यात ठिय्या आंदोलन

गुणेश गवस ः वनविभागाला इशारा

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २६ ः ‘ओंकार’ हत्तीवरील अत्याचारप्रकरणी वनखात्याने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याचा आरोप करत वाफोली येथील सामाजिक कार्यकर्ते गुणेश गवस यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. दिलेल्या आश्वासनांबाबत आजपर्यंत कोणतीही कार्यवाही न झाल्याने गुरुवारपासून (ता. २७) येथील श्रीराम चौक येथे ठिय्या आंदोलन सुरू करणार असल्याचे त्यांनी लेखी निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. समाधानकारक तोडगा न निघाल्यास बेमुदत उपोषणासह जनआंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
याबाबत गवस यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यांनी १० नोव्हेंबरला ओंकार हत्तीला लाकडी दांड्याने मारहाण करणारे तसेच सुतळी बॉम्ब फेकून त्याला मानसिकदृष्ट्या अस्थिर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, दोषींना सेवेतून निलंबित करावे तसेच ‘ओंकार’ला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडावे, या मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले होते. त्यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी सुहास पाटील यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती करत काही आश्वासने दिली होती; मात्र ही आश्वासने पूर्ण न करता वन खात्याने दिशाभूल केल्याचा आरोप गवस यांनी केला आहे. सुतळी बॉम्बचा वापर थांबवू, अशी हमी दिल्यानंतरही आठ दिवसांतच पुन्हा बॉम्ब फोडल्याचे त्यांनी नमूद केले आहे. वन खात्याच्या चुकीच्या माहितीमुळे व अपूर्ण आश्वासनांमुळे आंदोलनाचा पवित्रा घेतला असून वन विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचारी जबाबदार असतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

Toll Tax Rule Change : सरकारने बदलला टोल नियम!, आता अपूर्ण ‘एक्सप्रेस-वे’वर नाही होणार वसूली

Pune News : आयफोन विमा दावा नाकारल्याप्रकरणी ग्राहक आयोगाचा मोठा निर्णय; ८९ हजार परत करण्याचे आदेश

IND vs NAM : ७ षटकांत १०४ धावा चोपणारा भारत २०९ वर का अडकला? India vs Pakistan लढतीपूर्वी चिंता वाढवणारी गोष्ट

T20 WC IND vs NAM : इशान किशन, हार्दिक पांड्या बरसले, भारताने अनेक विक्रम नोंदवले; शेवटच्या १२ चेंडूंत ५ विकेट्स पडल्या

SCROLL FOR NEXT