कोकण

महाविकास आघाडीत पूर्णतः विस्कळीत वातावरण

CD

महाविकास आघाडीत पूर्णतः विस्कळीत वातावरण
उदय सामंतः आऊट व्हायचे की, षट्कार मारायचा ते ठरवा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २६ः येथील पालिकेची निवडणूक पाहिजे तेवढी सोपी राहिलेली नाही. महाविकास आघाडीत पूर्णतः विस्कळीत वातावरण आहे. त्यामुळे समोरून फुलटॉच आलाय, आऊट व्हायचे की, षट्कार खेचायचा ते ठरवा, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
चिपळूण पालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील माऊली बॅंक्वेट सभागृहात शिवसेना-भाजप युतीच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्यात अपेक्षित गर्दी न झाल्याने पालकमंत्री सामंत काहीसे नाराज झाले होते. या प्रसंगी नगराध्यक्षपदाचे उमेदवार उमेश सकपाळ म्हणाले, पालकमंत्र्यांनी चिपळूण शहरासाठी मोठ्या प्रमाणात विकासनिधी दिला आहे. त्यांच्या पुढाकाराने शहरात महत्वाचे प्रश्न मार्गी लागलेले आहेत. पालिका निवडणुकीसाठी ते पाचव्यांदा चिपळुणात आले. यावरून त्यांचे पक्षासाठी योगदान दिसून येते तर पालकमंत्री सामंत यांनी निवडणुकीच्या माहोलवरून उमेदवारांना खडेबोल सुनावले. ते म्हणाले, निवडणुकीत तिकीट मिळावे यासाठी जमाव आणला जायचा; मात्र प्रत्यक्षात उमेदवारी मिळाल्यानंतर पक्षाच्या मेळाव्याला लोक आणायचे विसरून जातात. कोणी हौसेपोटी, कोणी समाजकारणासाठी तिकिटे मागितली. युतीच्या उमेदवारांनी पॅनेल टू पॅनेल मतदान कसे होईल याकडे लक्ष द्यायला हवे.
या वेळी माजी आमदार सदानंद चव्हाण, संजय कदम, राजेंद्र महाडीक, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, भाजप नेते प्रशांत यादव, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon मुंबई-नागपूर महामार्गावर अर्टिगा कारने चौघांना उडवलं, दोन नंबर प्लेट अन् गाडीत पोलिसांच्या काठ्या

Kim Jong Un missile test : किम जोंग उन अमेरिका -इराण युद्धात उतरणार? क्षेपणास्त्रांच्या केल्या चाचण्या, किम जोंग यांची मुलगी उपस्थित

Stock Market Today: तेलामुळे शेअर बाजार कोसळला! पण गॅस संकटामुळे या कंपन्यांचे शेअर्स 10 मिनिटांत 11% वाढले

Bhandara Accident: सातारा जिल्ह्यातील अधिकाऱ्याचा भंडाऱ्यामध्ये अपघाती मृत्यू; खानावळीत जेवण करून दुचाकीवरून घरी निघाले अन्..

Kolhapur MPSC Candidate :भावी अधिकाऱ्यांचा जीव लागला टांगणीला; राज्यसेवा परीक्षेचा निकाल प्रलंबित, यादी प्रसिद्ध न झाल्याने अस्वस्थता

SCROLL FOR NEXT