rat२६p२६.jpg-
०६८०८
राजापूर नगर पालिका इमारत
फ्लॅश बॅक - लोगो
इंट्रो
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेल्या राजापूर नगरीचा प्रशासकीय कारभार हाकण्यासाठी १४९ वर्षांपूर्वी राजापूर नगरपालिकेची स्थापना झाली. त्यानंतर २७ जणांनी राजापूर शहराचे नगराध्यक्षपद भूषवले आहे. त्यात सात महिला नगराध्यक्षांचा समावेश आहे. त्यामध्ये तीन पिता-पुत्र, एक वडील-मुलगी आणि एक माता-पुत्राच्या जोडीने राजापूरचे नगराध्यक्षपद भूषवले आहे. एवढेच नव्हे तर, नगराध्यक्षपदानंतर पुढे आमदार (विधान परिषद सदस्य) होणाऱ्या हुस्नबानू खलिफे या राजापूरच्या एकमेव नगराध्यक्ष आहेत.
सात महिलांनी भूषवले नगराध्यक्षपद
राजापूर शहरामध्ये नगरपालिकेची स्थापना १८७६ ला झाली. त्यानंतर, राजापूरचे पहिले नगराध्यक्ष होण्याचा मान डॉ. विनायक सरखोत (१९४०-४१ ते २७.४.१९४३) यांना मिळाला. राजापूर नगरपालिकेच्या स्थापनेनंतर नगराध्यक्षपद भूषवलेल्यांमध्ये नन्हेसाहेब अहमद साहेब, यशवंत चव्हाण, लक्ष्मण लेले, इब्राहिम काझी, गजानन कुशे, प्रभाकर इंदुलकर, जावेद ठाकूर, मधुकर देवरूखकर, आनंद पाटणकर, म्हामूद मुल्ला, हनिफ काझी यांच्यासह तीन पिता-पुत्रांनी, एक वडील-मुलगी आणि एक माता-पुत्राच्या जोडीने राजापूरचे नगराध्यक्षपद भूषवले आहे.
राजापूर नगरपालिकेच्या इतिहासामध्ये आजर्यंत तब्बल सात महिलांनी नगराध्यक्षपद भूषवले आहे. त्यात हुस्नबानू खलिफे, वैशाली मांजरेकर, कल्याणी रहाटे, अपूर्वा मराठे, स्नेहा कुवेसकर, मुमताज काझी, मीना मालपेकर यांचा समावेश आहे. एका बाजूला नगराध्यक्षांची कारकीर्द संस्मरणीय राहिलेली असताना दुसर्या बाजूला राजापूर पालिकेच्या इतिहासामध्ये २७ डिसेंबर, १९८० ते १४ मे, १९८५ आणि २८ डिसेंबर २०२१ ते आजतागायत अशी केवळ दोनदाच प्रशासकीय कारकीर्द राहिली.
राजापूरचे नगराध्यक्षपद भूषवल्यानंतर पुढे विधान परिषद सदस्य होणाऱ्या हुस्नबानू खलिफे या एकमेव नगराध्यक्ष आहेत. विधान परिषद सभागृहामध्येही त्यांनी विविध विषयांवरील अभ्यासपूर्ण अन् मुद्देसूद भाषणांनी आपल्या कारकीर्दीचा वेगळा ठसा उमटवला. एवढेच नव्हे तर, राजापूरच्या पहिल्या लोकनियुक्त महिला नगराध्यक्षपद होण्याचा मानही हुस्नबानू खलिफे यांनी पटकावला आहे. त्याचवेळी त्यांचे सुपुत्र अॅड. जमीर खलिफे हेही लोकनियुक्त नगराध्यक्ष राहिले आहेत. त्यामुळे लोकनियुक्त नगराध्यक्ष राहिलेल्यांमध्ये हुस्नबानू खलिफे आणि अॅड. जमीर खलिफे हे एकमेव माता-पुत्र ठरले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.