06820
ई-केवायसी ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा
जिल्हाधिकारी ः राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत बैठक
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २६ ः राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी, आधार सिडिंग, मोबाईल सिडिंग तसेच शिधापत्रिका ऑनलाईन करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे तसेच जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील निरीक्षण अधिकारी, सर्व पुरवठा निरीक्षक आणि अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १,७८,७१७ लाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित आहे. ही प्रक्रिया ३० नोव्हेंबरपूर्वी शंभर टक्के पूर्ण करणे बंधनकारक आहे. संबंधित लाभार्थ्यांनी आपापल्या रास्तभाव दुकानदारांकडे जाऊन तत्काळ ई-केवायसी करावी.’
दरम्यान, आधार सिडिंगबाबत जिल्ह्यातील १२,३५६ लाभार्थ्यांचे आधार क्रमांक शिधापत्रिकेशी अजूनही संलग्न झाले नाहीत. त्यामुळे सर्व पात्र लाभार्थ्यांचे आधार क्रमांक तत्काळ जोडण्याचे निर्देश दिले. मोबाईल सिडिंग प्रक्रियेतही मोठ्या प्रमाणात काम शिल्लक असून, ३,९३,२३९ लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे बाकी आहे. शिधापत्रिकेतील किमान एका सदस्याचा मोबाईल क्रमांक जोडणे अत्यावश्यक आहे. संबंधितांनी तहसील कार्यालयाच्या पुरवठा शाखेत शिधापत्रिका व आधारकार्ड जमा करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांची कार्ड निर्मिती सुलभ होण्यासाठी शिधापत्रिका ऑनलाईन करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. यावेळी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील धान्याचे १०० टक्के उचल व वेळेत वाटप करण्याचे निर्देश सर्व संबंधित विभागांना दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.