कोकण

रत्नागिरीत मतांचे ध्रुवीकरण निश्चित

CD

रत्नागिरीत मतांचे ध्रुवीकरण निश्चित
कॉर्नरसभांवर भर; युती भक्कम, आघाडीचे काय?
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ : रत्नागिरी पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि अजितदादा पवार गट बाहेर पडल्याने मतांचे ध्रुवीकरण निश्चित आहे. सध्याच्या राजकीय घडामोडीमुळे शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपची युती अधिक भक्कम झाल्यामुळे आघाडीचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रचारातही युतीकडून कॉर्नरसभांवर तर आघाडीकडून थेट घरोघरी प्रचारावर भर देण्यात आला आहे.
पालिकेतील राजकीय वातावरण दिवसेंदिवस बदलत आहे. महायुतीमध्ये एकवाक्यता आल्यामुळे शिंदे शिवसेनेकडून पालकमंत्री उदय सामंत तर भाजपकडून दीपक पटवर्धन आदी पदाधिकारी प्रभागामध्ये जाऊन प्रचार करत आहेत. शहरात केलेल्या विकासकामांची उजळणी मतदारांसमोर करत आहेत. भविष्यात काय विकासाच्या संकल्पना आहेत, हे विशद करत आहेत. कॉर्नरसभांवर अधिक भर दिला आहे त्यामुळे महायुतीकडून राजकीय वातावरण ढवळून काढले गेले आहे. शहरात शिवेसना आणि भाजपची ताकद असल्याने महायुतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) गटाला डावलण्यात आले. हा पक्ष महायुतीतून बाहेर पडला आहे.
महाविकास आघाडीतही हीच परिस्थिती आहे. विधानसभा निवडणुकीची उमेदवारी उबाठाला द्यायची आणि नगरपालिकेत नगराध्यक्षाची जागा राष्ट्रवादीला सोडण्याचा अलिखत करारा झाला होता; परंतु उबाठाने तो पाळला नाही. बाळ माने यांनी आपली फसवणूक केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते बशिर मुर्तुजा हे आघाडीतून बाहेर पडले; परंतु त्यांनी नगराध्यक्षपदासाठी आपल्या पत्नी वहिदा मुर्तुजा यांना उभे केले. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येऊन त्यांनी नगराध्यक्षपद आणि नऊ जागांसाठी या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. मुर्तुजा या रिंगणात असल्याने अल्पसंख्यांक समाजासह अनेक प्रभागात राष्ट्रवादीची मते तिकडे वळतील, असा अंदाज आहे. त्यात उबाठाच्या मतांचे विभाजन होण्याची जास्त शक्यता आहे. शिवसेनेत माजी नगरसेवकांची मोठी संख्या आहे. त्यामुळे त्या त्या प्रभागात त्यांचा प्रभाव मानला जातो तर ठाकरे सेनेत बहुसंख्य नवीन चेहरे आहेत. मतदार नव्या चेहऱ्यांना संधी देणार की, जुन्यांना? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Oman Sea Attack : ओमानच्या समुद्रात इराणचा हल्ला; भारतीय जहाज लक्ष्य, तीन जणांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : इस्त्राईलला धोक्याची घंटा

Iran-Israel War: खामेनेई यांचं भारतातल्या 'या' गावाशी होतं खास कनेक्शन; मृत्यूची बातमी कळताच गावावर शोककळा

Beetroot Sprouts Chilla: सकाळचा नाश्ता हेल्दी आणि हटके हवाय? मग हा बीट-स्प्राऊट्स चिला एकदा ट्राय कराच!

इराणच्या हल्ल्यातून थोडक्यात वाचला ध्रुव राठी, पहाटे दुबई विमानतळावरून केलं होतं उड्डाण, कुटुंबीय अजूनही अडकलेले

SCROLL FOR NEXT