कोकण

संविधान हा भारतीयांसाठी ''महाग्रंथ''

CD

swt2632.jpg
06862
खारेपाटणः भारतीय संविधान दिनानिमित्त आयोजित फेरीमध्ये विद्यार्थी, पालक व मान्यवर सहभागी झाले.

संविधान हा भारतीयांसाठी ‘महाग्रंथ’
प्राची ईसवलकरः खारेपाटण येथे संविधान दिन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २६ : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली देशाची राज्यघटना अर्थात भारतीय संविधान हा आपल्या भारत देशाला मिळालेला महान ग्रंथ आहे, असे प्रतिपादन सरपंच प्राची ईसवलकर यांनी खारेपाटण पंचशीलनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या संविधान दिन कार्यक्रमात केले. संविधान दिन फेरी काढून साजरा करण्यात आला.
यावेळी खारेपाटण महाविद्यालय ते खारेपाटण बाजारपेठ, बुद्धविहार पंचशीलनगर अशी भव्य संविधान फेरी शालेय विद्यार्थी, एनसीसी विद्यार्थी, शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व संविधानप्रेमी नागरिक यांच्या प्रमुख उपस्थित काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी संविधान जागृतीच्या विविध घोषणा दिल्या. या कार्यक्रमाला सरपंच ईसवलकर, उपसरपंच महेंद्र गुरव, खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे, पंचशील विकास मंडळ खारेपाटणचे माजी अध्यक्ष संतोष पाटणकर, जयदीप देसाई, सुधाकर ढेकणे, किरण कर्ले, दक्षता सुतार, ग्रामविकास अधिकारी विशाल वरवडेकर, खारेपाटण महाविद्यालयाचे प्राध्यापक गजानन व्हंकळी, प्रा. सौ. देसाई, एनसीसी ५८/ महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्ग ओरोस विभागाचे नायक सुभेदार विनोद सिंह, हवालदार अमित कुमार, बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण संघटनेचे सचिव सागर पोमेडकर, खजिनदार दीपक जाधव, संतोष पाटणकर, संघमित्रा महिला मंडळाच्या कार्यकर्त्या आकांक्षा पाटणकर, पूजा कदम, स्निग्धा पोमेडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी खारेपाटण महाविद्यालय येथे सर्व विद्यार्थी व नागरिकांच्या उपस्थितीत भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. यानंतर काढण्यात आलेल्या संयुक्तिक संविधान रॅलीचा समारोप पंचशीलनगर येथील बुद्धविहारात करण्यात आला. संविधान दिन समारोप कार्यक्रमात पंचशील विकास मंडळाच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी प्रा. कांबळे यांनी, भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधान असल्याचे सांगून त्यातील हक्क, अधिकार आणि कर्तव्ये घराघरात पोहोचली पाहिजेत, असे सांगितले. पंचशीलनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याला सरपंच व उपसरपंच यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. संतोष पाटणकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune New Police Stations : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ; शहरात पाच नवीन पोलिस स्टेशन्स वाढणार, जाणून घ्या कुठे?

WPL 2026 All Team Players: दीप्ती शर्मा महागडी खेळाडू, तर मुंबई इंडियन्सनेही केरसाठी मोजले ३ कोटी; पाहा लिलावानंतरचे सर्व संघ

Rajan Patil: ''त्या' दोघांना मानवी विष्टा खायला घातली'', पंडित देशमुख खून प्रकरणाची धक्कादायक पार्श्वभूमी

Barshi Crime : बार्शीत एसटी वाहकाला मारहाण; कॉलर पकडून धमक्या, ३ हजार रुपये गायब; दोघांवर गुन्हा दाखल!

Latest Marathi News Live Update: अंजली दमानिया दिल्लीत दाखल, अमित शाहांची घेणार भेट

SCROLL FOR NEXT