जिल्ह्यात आजपासून
पावसाची शक्यता
ढगाळ वातावरणामुळे बागायतदारांत धास्ती
रत्नागिरी, ता. २६ : भारतीय हवामान विभागाच्या सूचनेनुसार २७ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत कोकण भागातील जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार बुधवारी (ता. २६) रत्नागिरीत सायंकाळी ढगाळ वातावरण होते. वातावरणातील बदलांमुळे बागायतदार धास्तावलेले आहेत.
हवामान विभागाकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नैऋत्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे. मागील आठवड्यात रत्नागिरी जिल्ह्यात थंडीचे वातावरण होते. मात्र, मागील दोन दिवस थंडीऐवजी उष्मा वाढलेला होता. काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदार धास्तावलेले होते. वातावरणातील या बदलांचा सर्वाधिक परिणाम हापूसवर होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.