कोकण

''मिलाग्रीस''मध्ये संविधान दिन उत्साहात

CD

swt275.jpg
06981
सावंतवाडीः संविधान दिन कार्यक्रमास डॉ. सिद्धार्थ भांबुरे, फादर रिचर्ड सालदाना, संध्या मुणगेकर उपस्थित होते.

‘मिलाग्रीस’मध्ये संविधान दिन उत्साहात
विविध कार्यक्रमांना प्रतिसादः सेल्फी पॉइंट ठरला लक्षवेधी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २७ः मिलाग्रीस प्रशालेत संविधान दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. सिद्धार्थ भांबुरे उपस्थित होते.
सर्वप्रथम संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर आठवी व नववीच्या विद्यार्थिनींनी संविधानावर आधारित गीतावर नृत्य सादर केले. सातवी ‘ब’ ची विद्यार्थिनी शमिका सावळ हिने संविधानाचे महत्त्व स्पष्ट केले. डॉ. भांबुरे यांनी संविधानाची पूर्वपीठिका व संविधानाची आजच्या काळातील गरज विशद केली.
संविधान दिनाचे महत्त्व सांगणारी सुंदर अशी पार्श्वभूमी यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी मिळून साकारली. संविधान दिनानिमित्त खास सेल्फी पॉइंट देखील प्रशालेच्या विद्यार्थी व शिक्षकांनी मिळून बनविला होता. पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी संविधानावर आधारित रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेचे परीक्षण बांदेकर फाईन आर्ट कॉलेजचे प्रा. एकनाथ मोरजकर यांनी केले.
सातवी अ व ब चे विद्यार्थी तसेच वर्गशिक्षकांतर्फे शहरातून जागृती रॅली काढण्यात आली. प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका वर्षा देवण यांनी सूत्रसंचालन केले.
मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदाना, हायस्कूल पर्यवेक्षिका संध्या मुणगेकर, इंग्रजी प्रायमरी पर्यवेक्षिका क्लिटा परेरा, मराठी प्रायमरी मुख्याध्यापिका कविता चांदी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

Toll Tax Rule Change : सरकारने बदलला टोल नियम!, आता अपूर्ण ‘एक्सप्रेस-वे’वर नाही होणार वसूली

SCROLL FOR NEXT