कोकण

संविधानामुळेच भारतीय नागरिक मोकळा श्‍वास घेतोय

CD

swt271.jpg
06975
कणकवली ः शहरातील बुद्धविहार येथे संविधान दिनानिमित्त पालकमंत्री नीतेश राणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

संविधानामुळेच भारतीय नागरिक मोकळा श्‍वास घेतोय
नीतेश राणे : कणकवलीत संविधानदिनी डॉ. आंबेडकर यांना अभिवादन
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २७ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे भारतीय नागरिक म्हणून आपण मोकळा श्वास घेतो आहोत. त्‍यामुळे संविधानाची ताकद मजबूत करण्यासाठी आमचे काम सुरू आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री नीतेश राणे यांनी येथे केले.
कणकवली बुध्द विहार येथे संविधान दिनाच्या निमित्ताने पालकमंत्री राणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी भाजपचे नगरसेवक पदाचे उमेदवार मयुरी चव्हाण, गौतम खुडकर, अशोक कांबळे, राजू चव्हाण, विनायक तांबे, किरण जाधव, सुशील कदम, अजित तांबे, तुकाराम फोंडेकर, सुभाष कदम, सिद्धार्थ जाधव, महेंद्र जाधव, वैभव जाधव, तेजस कांबळे, प्रदीप खुडकर यांच्यासह भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, अल्पसंख्यांक विभागाचे निसार शेख आदी उपस्थित होते.
श्री. राणे म्‍हणाले, ‘‘देशातील प्रत्‍येक नागरिकाच्या भविष्याला आकार देण्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे योगदान आहे. संविधान दिनाच्या निमित्ताने आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी म्हणून त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन संविधानाची ताकद मजबूत करण्याच्या दृष्टीने काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. सिंधुदुर्ग जिल्हा डॉ. आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा जिल्हा आहे. वर्षोनुवर्षे ज्या वाड्यावस्त्यांना जातिवाचक नावे दिली होती, ती बदलून संविधानाच्या अधीन राहून नवीन नावे दिली आहेत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Crime : बारामती तालुका पोलिसांनी प्रेमी युगुलाला लुटणा-या तिघांना काही तासात केले गजाआड....

Mathura Holika Dahan: जळत्या होळीमध्ये चालतो माणूस; मथुरेतील 'या परंपरेमागचं रहस्य काय? ४५ दिवसही करतो अन्नत्याग

ISRO मध्ये वैज्ञानिक असल्याचे सांगत लग्नाचं आमिष; पुण्यातील महिलेकडून ४२ लाख रुपये उकळले...

IND vs ENG, Semi: भारताने इंग्लंडविरुद्ध कोणती Playing XI खेळवावी? रवी शास्त्री, रिकी पाँटिंग यांचा सल्ला; म्हणाले, अभिषेकला तर...

विकी कौशल चिमुकलीच्या चक्क पडला पाया! स्टेजवरचा तो क्षण पाहून सगळेच झाले भावूक, Viral Video

SCROLL FOR NEXT