कोकण

संजू परब-मिहीर मठकर बातमी

CD

दोन बातम्या समोरासमोर

swt2719.jpg
07039
सावंतवाडी ः येथे संजू परब यांनी प्रचार सभेत मार्गदर्शन केले.

सावंतवाडीकरांनी
आमिषाला बळी पडू नये
संजू परबः मला पराभूत करण्यासाठी चक्रव्युह
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २७ ः पैसे वाटून मला राजकारणातून संपवायचा डाव सुरु आहे. कोणीही कितीही आमिषे दाखविली तरी आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा प्रभाग सातचे नगरसेवक पदाचे उमेदवार संजू परब यांनी येथे केले. मी खरं बोलतो म्हणून मला पराभूत करण्यासाठी चक्रव्युह रचला जात आहे. पण, ज्या लोकांसाठी मी काम ती माझी लोकं मला पराभूत करणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
येथील पालिकेच्या प्रभाग सातमध्ये आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘पैशाच्या विरोधातील ही लढाई आहे. पुढे जाणाऱ्याला रोखायचे, अस्तित्व नष्ट करण्यासाठी मला पराभूत करायचं आहे. पैसे वाटून राजकारणातून संपवायचा डाव आहे. पण, ही लोक माझ्यासोबत आहेत. मी नगराध्यक्ष म्हणून दोन वर्ष काम केले. राजघराण्यातील व्यक्ती नगराध्यक्ष झाल्यास मोती तलाव हातातून कशावरून जाणार नाही? आज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कशामुळे रखडले. बाजारपेठील नाथ पै सभागृहासमोरील दुकानदारांना नोटीसा गेलेल्या आहेत त्यामुळे जनतेने वेळीच सावध व्हावे.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘तुमच्या समस्या आमच्याकडे बिनधास्त बोलू शकता. मी नगराध्यक्ष असताना विकासकामांचे ठराव घेतले. त्यामुळे पैशाला मत देऊ नका, कामाला मत द्या.’’ ॲड निता सावंत-कविटकर यांनी २० उमेदवार माझ्यासोबत आहेत. त्यामुळे आम्हाला २१-० करायचं आहे. प्रभाग ७ मध्ये संजू परब यांना घेरण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांच्यामागे आपल्याला उभं राहायच आहे. येथील जमीनी संस्थानच्या असल्याचा दावा कोर्टात आहे. या जमीनीची ताबा मिळावा, नुकसानभरपाई मिळावी म्हणून याचिका आहे. त्यामुळे सावंतवाडी सुरक्षित ठेवायची असेल तर याचा विचारा व्हावा. आमिषांना बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, संपर्क प्रमुख राजेश मोरे, आनंद शिरवलकर, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर उपस्थित होते.
-----------------
swt2720.jpg
07040
सावंतवाडीः येथे पत्रकार परिषदेत बोलताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश बोंद्रे. सोबत मिहीर मठकर व इतर मान्यवर.

सावंतवाडीच्या विकासात
मठकर कुटुंबांचं योगदान
मिहीर मठकर ः विकासाचा रोड मॅप तयार, संधी द्या
सकाळ वृत्तसेवाड
सावंतवाडी, ता. २७ः माजी आमदार जयानंद मठकर यांनी सावंतवाडीसाठी दिलेलं योगदान मोठं आहे. १९७४ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. सामान्यातील आमदार अशी त्यांची ओळख होती. शहरातील पाणी प्रश्न गंभीर होता. यावेळी पाळणेकोंड धरणासाठी त्यांनी प्रयत्न केला. शहरात पाणी टंचाई भासत नाही याच श्रेय श्री. मठकर यांना आहे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश बोंद्रे यांनी व्यक्त केले. तसेच मठकर कुटूंबांच शहरविकासाठी योगदान मोठं आहे‌. विकासाचा रोड मॅप आम्ही तयार केला असून नगराध्यक्षपदासाठी सीमा मठकर यांना संधी द्यावी, असे आवाहन मिहीर मठकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले.
श्री. मठकर पुढे म्हणाले, ‘‘माजी आमदार मठकर यांनी जिल्हा न्यायालय सावंतवाडीत आणले. विडी कामगार, नगरपालिकात कामगारांचे प्रश्न त्यांची सोडवले. स्वखर्चाने समाजोपयोगी काम त्यांनी केली. सावंतवाडी संस्थान विलीनीकरणासाठी प्रजापरिषदेच्या संग्रामात सहभाग घेतला. धान्य भाववाढ विरोधी सत्याग्रहात सहभागी झाल्याने त्यांना एक महिना कारागृहवास झाला होता. त्यांनी केलेलं कामास तेवढंच महत्व आहे‌. शहर विकास करण्यासाठी अनेकांच योगदान आहे‌. त्यामुळे सीमा मठकर यांना संधी दिल्यास आम्ही डास निर्मुलन, अंडरग्राऊंड गटार योजना आदी नांदेड पॅटर्न आम्ही राबवणार आहोत. रिंगरोड प्रकल्प, मत्स्यालय निधी विनियोग, रोप-वे, पर्यटनदृष्ट्या शहर कसं सुंदर करता येईल यासाठी प्रयत्न करणार आहोत. शहराच्या विकासासाठीचा रोड मॅप आम्ही तयार केला आहे. जयानंद मठकर यांच योगदान सावंतवाडीस ठाऊक आहे. त्यामुळे सीमा मठकर यांनाही संधी द्यावी. लोकांसाठी कार्य करणार आमचं कुटुंब आहे. गोळीबार अंगावर झेलणाऱ्या कुटुंबाचा वारसा आम्ही पुढे घेऊन जाणार असून शहर विकासासाठी आम्हाला साथ द्यावी.’’
यावेळी ज्येष्ठ नेते रमेश बोंद्रे, बाळासाहेब बोर्डेकर, सागर तळवडेकर, यश सावंत आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Oman Sea Attack : ओमानच्या समुद्रात इराणचा हल्ला; भारतीय जहाज लक्ष्य, तीन जणांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : इस्त्राईलला धोक्याची घंटा

Iran-Israel War: खामेनेई यांचं भारतातल्या 'या' गावाशी होतं खास कनेक्शन; मृत्यूची बातमी कळताच गावावर शोककळा

Beetroot Sprouts Chilla: सकाळचा नाश्ता हेल्दी आणि हटके हवाय? मग हा बीट-स्प्राऊट्स चिला एकदा ट्राय कराच!

इराणच्या हल्ल्यातून थोडक्यात वाचला ध्रुव राठी, पहाटे दुबई विमानतळावरून केलं होतं उड्डाण, कुटुंबीय अजूनही अडकलेले

SCROLL FOR NEXT