कोकण

कनकनगरमध्ये रस्त्यांचा प्रश्‍न जटील

CD

प्रभागाचे अंतरंग १६ आणि १७

swt2722.jpg
07045
कणकवलीः शहरातील कनकनगर येथे अशा अरूंद रस्त्यावरून जा-ये करावी लागते.

swt2723.jpg
07046
कणकवली ः शहरातील रेल्‍वे स्थानक हद्दीलगत प्रस्तावित असलेला नवा रस्ता तयार करावा अशी नागरिकांची मागणी आहे.

swt2724.jpg
O07047
कणकवली ः शहरातील कनकनगर येथील बंधाऱ्यात पूर्ण क्षमतेने पाणी साठा व्हावा तसेच हळवल आणि कणकवलीच्या बाजूने जोड रस्ते होण्याची नागरिकांना प्रतीक्षा आहे.

swt2725.jpg
07048
कणकवली ः शहरातील रेल्‍वे स्थानक ते कनकनगर भागातील फुटपाथ वर झाडीझुडूपे वाढली आहेत.

swt2726.jpg
07049
कणकवली ः शहरातील परबवाडी, कनकनगर भागात सांडपाणी साठून राहत आहे.

कनकनगरमध्ये रस्त्यांचा प्रश्‍न जटील
सांडपाणी निचऱ्याचीही समस्याः पर्यायी रस्ते उभारणीची मागणी
राजेश सरकारेः सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २७ः शिवाजीनगरचा दक्षिणेकडील भाग आणि कनकनगरचा संपूर्ण भाग हा प्रभाग १६ आणि १७ मध्ये समाविष्‍ट झाला आहे. या दोन्ही भागांमध्ये घरे आणि संकुलांची प्रचंड दाटी झाली आहे. त्‍या तुलनेत प्रशस्त रस्ते नाहीत. जेमतेम तीन आसनी रिक्षा जाईल एवढ्याच रूंदीचे रस्ते असल्‍याने नागरिक, वाहन चालकांची मोठी गैरसोय होत आहे. याखेरीज गटार व्यवस्था नसल्‍याने सांडपाणी ठिकठिकाणी साठून राहण्याचीही समस्या या प्रभागांमध्ये आहे.
शिवाजीनगरच्या दक्षिणेकडील भागातील नागरिकांना जा-ये करण्यासाठी अरूंद गल्ल्या आहेत. नवीन नरडवे रस्ता तयार झाल्‍यानंतर या भागात घरकुलांची, संकुलांची संख्या वाढली. त्या तुलनेत रस्ते तेवढेच राहिले. त्‍यामुळे अग्निशमन बंब तथा मोठी वाहने या भागात जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. शिवाजीनगरप्रमाणेच कनकनगरमध्येही दाटीवाटीने वसलेली घरे आणि संकुले आहेत. कनकनगरमध्ये जाण्यासाठी दुर्गाराम मंगल कार्यालय येथून जाणारा रस्ता अत्‍यंत अरूंद आहे. तर तेली गुरूजी यांच्या घराकडून जाणारा रस्ता थोडा रूंद असल्‍याने मोठी वाहने कशीबशी जाऊ जा-ये करतात. यात दोन अवजड वाहने समोरासमोर आल्‍या मात्र वाहतूक कोंडी निर्माण होते.
कनकनगरसाठी रेल्‍वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म २ कडून मोठा रस्ता प्रस्तावित आहे. या रस्त्यासाठी स्थानिकांच्या जागा संपादन कराव्या लागणार आहेत. या जमीन मालकांना बाजारभावानुसार जागेचा दर अपेक्षित आहे. त्‍याबाबत नगरपंचायत आणि स्थानिक जमीन मालकांमध्ये समन्वय न झाल्‍याने या रस्त्याचा प्रश्‍न जैसे थे राहिला आहे.
कनकनगर भागाला गडनदीची किनार आहे. या ठिकाणी बंधाराही उभारण्यात आला आहे. दरवर्षी या बंधाऱ्यात पाणीसाठवण होते. मात्र बंधाऱ्याच्या प्लेट योग्‍यरित्‍या बसविल्‍या जात नसल्‍याने पाणी वाहून जाते. मे महिन्यात ही नदी कोरडी पडते. याच कनकनगर भागात शहराला पाणी पुरवठा करणारी जॅकवेल आहे. त्‍यामुळे कनकनगर बंधाऱ्यात पूर्ण क्षमतेने पाणी साठा व्हावा अशी इथल्‍या नागरिकांची अपेक्षा आहे.
कनकनगरमध्ये सांडपाण्यासाठी कुठेच ड्रेनेज व्यवस्था नाही. त्‍यामुळे कुंपणामध्येच पाणी अडविले जाते. त्‍यामुळे डासांचा मोठा प्रादुर्भाव इथल्‍या नागरिकांना सोसावा लागत आहे. कनकनगरमध्ये ज्‍या प्रमाणत लोकवस्ती आहे. त्‍या तुलनेत ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आलेले नाहीत. त्‍यामुळे कनकनगरवासीयांना कमी दाबाचा वीज पुरवठा होतो. अनेक वेळा वीज उपकरणांचे जळून नुकसान होते. याखेरीज मोबाईल कंपन्यांचे टॉवर देखील सक्षमपणे चालू नाहीत.
कनकनगर भागात काही घरे उंचावर तर काही घरे सखल भागात आहेत. या घरांना पावसाळयात मोठा त्रास सहन करावा लागते. सक्षम गटारे नसल्‍याने पावसाचे पाणी थेट रस्त्यावरूनच वाहते. अतिवृष्‍टी कालावधीत तर सखल भागातील घरे, विहिरींमध्ये हे पाणी जाते. या भागातील घरे एवढी दाटीवाटीने आहेत की गटारे करायची झाल्‍यास अनेकांची घरातून, चिरेबंदी कुंपणातून मार्ग काढावा लागणार आहे. त्‍यासाठी नागरिकांची तयारी नसल्‍याने इथल्या सांडपाण्याचा प्रश्‍न सुटलेला नाही.
शहरातील कनकनगर भागात एकही उद्यान नाही. त्‍यामुळे या प्रभागात विरंगुळ्यासाठी या भागातील मुले रेल्‍वे हद्दीतील उद्यानात जातात. तर ज्‍येष्‍ठ नागरिक विरंगुळ्यासाठी चक्‍क रेल्‍वे स्थानकातील प्लॅटफॉर्म गाठतात. त्‍यामुळे कनकनगरमध्येही उद्यानाची निर्मिती व्हावी अशी इथल्‍या रहिवाशांची मागणी आहे. याखेरीज कनकनगर येथून लगतच हळवल गाव आहे. या गावाला जोडण्यासाठी बंधारा देखील झाला आहे. मात्र दोन्ही बाजूंनी पुरेसे जोड रस्ते नाहीत. या रस्त्यांची सुविधा व्हावी, अशीही इथल्‍या नागरिकांची मागणी आहे. येथील गडनदी काठावर कुठेही गणपणती साणा उभारण्यात आलेला नाही. त्‍यामुळे गणेश मूर्ती विसर्जन सोहळ्यावेळी नागरिकांची गैरसोय होते. नदीपर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्‍याने चिखलातून मार्ग काढत भाविकांना मूर्ती विसर्जनासाठी जावे लागते. यावर देखील तोडगा काढला जावा, अशी मागणी इथल्‍या नागरिकांची आहे.
-----------
कोट
कनकनगरला सध्या प्रशस्त रस्त्याची गरज आहे. नियोजन आराखड्यात असलेला रेल्‍वे हद्दीला लागून नवा रस्ता तयार झाला तर या प्रभागातील सर्व घरांना जोडला जाणार आहे. याखेरीज गडनदीकाठी सुंदर उद्यान उभारणी झाली तर इथल्‍य नागरिकांसाठी विरंगुळ्याचे साधन उपलब्‍ध होणार आहे.
- प्रकाश सावंत, नागरिक
-----------------
प्रभाग -१६
* मतदार - ८७२
* आरक्षण - खुला
* प्रभागातील समाविष्ट भाग : परबवाडी मधील उर्वरित भाग व शिवाजीनगर मधील दक्षिणेकडील भाग.
---------
प्रभाग - १७
* मतदार : ७१४
* आरक्षण - सर्वसाधारण
* प्रभागातील समाविष्ट भाग : कनकनगर
------------
- समाप्त
------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Israel Iran conflict : अमेरिका, इस्राईलनंतर आता इंग्लंड, फ्रान्स, जर्मनीही इराण विरोधात युध्दात उतरले

छावासाठी पुरस्कार जिंकताच विकी कौशलची पोस्ट, पोस्टवर संतोष जुवेकर कमेंट करत म्हणाला...

Latest Marathi News Live Update : नागपूरमध्ये फेब्रुवारीत हवेची गुणवत्ता खालावली; महाल परिसर सर्वाधिक प्रदूषित

Iran-Israel conflict: इराण-इस्रायल संघर्षात पुणेकर संकटात? सुरक्षित परतीसाठी महापालिकेची तातडीची हालचाल

Jalna News : जालना ड्रायपोर्ट महिनाभरात होणार सुरू! ४२५ एकरांवरील प्रकल्पातून मराठवाडा-विदर्भाची उत्पादने आता थेट परदेशात जाणार

SCROLL FOR NEXT