कोकण

पारंपरिक ढोल–ताशा, संबळ वादकांची उपासमार

CD

- rat२७p१८.jpg-
P२५O०६९८८
संगमेश्वर ः नवीन वाद्य वाजवणारी तरुण पिढी.
---
पारंपरिक ढोलताशा, संबळ वादकांची उपासमार
कलावंतांचे अस्तित्व धोक्यात; ‘डीजे’ला वाढती मागणी
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २७ ः काळ बदलला आणि प्रत्येक क्षेत्रात नवनवीन स्पर्धा निर्माण झाली. त्याच्या झळा आता पारंपरिक वाद्यकलेला बसत आहेत. एकेकाळी लग्न, साखरपुडा, हळद, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव अशा प्रत्येक सोहळ्यात ढोलताशा, झांज, संबळ, बॅंजो, बँड पथकांची धूम असायची; पण डीजे संस्कृती झपाट्याने वाढल्याने पारंपरिक वाद्यांना मोठ्या प्रमाणात घरघर लागली आहे. त्यामुळे ही वाद्ये कला जोपासणाऱ्या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
आजच्या तरुणाईला डीजेची भुरळ असल्याने पारंपरिक वाद्य वाजवणाऱ्या कलाकारांकडे कोणीच पाहत नाही. पूर्वी लग्नसराई म्हटली की, पाच दिवस वाद्य-पथकांची सततची धावपळ सुरू असायची. सुपारी कार्यक्रमापासून वधू-वरांना गावदेवतेचे दर्शन घडवण्यापर्यंत. त्या बदल्यात दोनवेळच्या जेवणासह पाच ते आठ हजार रुपये मानधन शिवाय ओवाळणी वेगळी. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, धार्मिक कार्यक्रमात तर संबळ पथकं अपरिहार्यच होती. एका पथकात पाचजण सहभागी असायचे. दोन संबळ वादक, दोन सनई वाजवणारे आणि एक सूर सेट करणारा. गावागावांत आनंदोत्सवाचे हृदय ठरायचे हे वाद्य; परंतु, गेल्या दहा–बारा वर्षांत डीजेच्या प्रचंड प्रसारामुळे पारंपरिक कला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. वर्षभरात एक-दोन लग्न किंवा धार्मिक कार्यांसाठी चौकशी येते. जेवढं काम त्या दिवशी मिळतं त्यात या वाद्यांची देखभालसुद्धा भागत नाही, अशी हाळी कलाकार व्यक्त करत आहेत.
एकेकाळी ग्रामीण भागात शंभरहून अधिक कलाकार ढोलताशा, झांज, संबळ, बॅंजो वाजवत होते; मात्र काळाच्या ओघात लोकांच्या पसंतीतून ही वाद्ये बाद झाली आणि नवीन पिढीदेखील या कलेकडे पाठ फिरवत आहे. महागाईच्या झळा आणि मानधनाची घटती रक्कम यामुळे बाहेरील पथकं बोलावणं तर दूरच, स्थानिक पथकांनाही योग्य मोबदला मिळत नाही. कधी महिनाभर आधी इसार देऊन पथकं निश्चित होत असत. आता गणेशोत्सव–नवरात्रोत्सवासाठी सुद्धा वादकांना काम मिळत नाही. अनेकांनी वाद्ये आठवण म्हणून ठेवली आहेत; पण पुन्हा वाजवण्याची संधी मिळत नाही. आधुनिक साहित्य विकत घेण्याची आर्थिक ताकद नाही, म्हणत काही लोकं जुन्या वाद्यांवरच दिवस काढत आहेत. किरकोळ कार्यक्रम असला तर एखादा वादक एकटाच बोलावला जातो. त्यामुळे त्या व्यक्तीलाच त्याचा लाभ मिळतो.
-------
कोट
दहा वर्षांपूर्वी आम्हाला गावात बोलावलं की, आमचा सत्कार, आदरातिथ्य केले जात होते. दोन दिवस आम्ही तिथे थांबत होतो. मन प्रसन्न होत होते. आता ‘डीजे’ आला आणि सगळंच बदललं. तो काळही संपून गेला आहे. पारंपरिक वाद्यांची गावागावांतली नादमयी संस्कृती आणि अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह, हे तिन्ही संकटात आले आहेत. डीजेच्या धडाक्यात पारंपरिक ध्वनी आणि त्यासोबत अनेक कलाकारांचे भविष्यही हरवत चालले आहे.

- राजेश यादव, ताशेवादक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress review meeting chaos : बिहार निवडणुकीत दारुण पराभवामुळे दिल्लीत काँग्रेसच्या आढावा बैठकीत गोंधळ; नेत्यांमध्ये जोरदार वाद!

Santosh Deshmukh Case: फरार कृष्णा आंधळेच्या शोधाबाबत अहवाल सादर करा; न्यायालयाच्या सूचना; १२ डिसेंबरला आरोप निश्‍चिती शक्य

Pune Police : आंदेकर टोळीने उमरटीतून १५ पिस्तुले विकत घेतली;टोळीवर आणखी एक गुन्हा दाखल होणार!

Ghodegaon Theft : घोडेगाव पोलीस ठाणे हद्दीत रात्रीच्या चोरीप्रकरणी दोन आरोपी अटकेत!

Pune New Police Stations : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ; शहरात पाच नवीन पोलिस स्टेशन्स वाढणार, जाणून घ्या कुठे?

SCROLL FOR NEXT