कोकण

किनारपट्टीलगतचा भाग विकासाच्या प्रतिक्षेत

CD

प्रभागाचे अंतरंग - ८

किनारपट्टीलगतचा भाग विकासाच्या प्रतिक्षेत
मालवणातील प्रभाग आठः समस्या सोडवणार कोण ?
प्रशांत हिंदळेकर : सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २७ : मालवण पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक आठमध्ये भाजप, शिंदे शिवसेना, ठाकरे शिवसेना अशी तिरंगी लढत लक्षवेधी ठरणार आहे. किनारपट्टीला लागून असलेल्या या प्रभागात गेल्या काही वर्षांत म्हणावा तसा विकास झालेला नाही. पर्यटन व्यावसायिकांना, स्थानिक रहिवाशांना सांडपाणी, वाढत्या डासांचा प्रादुर्भाव, कमी दाबाचा वीज पुरवठा यासह अन्य समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत सर्वच उमेदवारांचा कस लागणार आहे. यात कोण बाजी मारतो? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
प्रभाग क्रमांक आठची लोकसंख्या २२५९ एवढी आहे. या प्रभागात गवंडीवाडा, आशापार्क कॉम्प्लेक्स, राम मंदिर यांचा समावेश आहे. सोमवार पेठ रस्त्याने गवंडी घर ते बावकर पाणंद भरड येथील राज्य मार्ग १८२ लगत रेवंडकर घर ते राज्य मार्ग १८२ ने भरड नाक्यापर्यंत भरड नाका ते कोळंबकर गल्ली रस्त्याने आशापार्क शेतमाळ्यातून सोमवार पेठ स्मशान रस्त्यापर्यंत सोमवार पेठ स्मशान रस्त्याने सार्वजनिक पसंत शाळा चव्हाण घर ते पिंटो घर पासून पुढे समुद्रकिनाऱ्यापर्यंत सोमवार पेठ स्मशानभूमी रस्त्याने समुद्रकिनाऱ्यापासून फिश मार्केट पर्यंत या भागाचा समावेश आहे. या प्रभागात ६१३ पुरुष तर ६३९ महिला मतदारांचा समावेश आहे.
या मतदार संघावर ठाकरे शिवसेनेचे वर्चस्व गेली काही वर्षे राहिले आहे. मात्र, बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे येथील समीकरणे बदलली आहेत. या प्रभागात बाजारपेठेत जाणाऱ्या मुख्य रस्त्याचा समावेश आहे. दुसऱ्या बाजूने गवंडीवाडा भाग आहे. या भागात पुरातन राम मंदिर आहे. या भागाला लागूनच किनारपट्टी असल्याने पर्यटकांना दांडी येथे जाण्यासाठी या प्रभागातून जावे लागते. त्यामुळे या भागात पर्यटन व्यावसायिक, निवास व्यवस्थेच्या सुविधा उपलब्ध आहेत. मच्छीमार समाजही या भागात बऱ्यापैकी आहे.
पर्यटनाच्या दृष्टीने या भागात महत्वाची समस्या भेडसावते ती कमी दाबाच्या वीज पुरवठ्याची. दांडी किनाऱ्याकडे जाणारा रस्ता याच भागातून जातो. या रस्त्याचा वापर पर्यटक तसेच मत्स्य व्यावसायिकांकडून होत असतो. नियमित होत असलेल्या वाहतुकीमुळे हा रस्ता वाळूमय बनतो. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरील वाळूची समस्या भासत आहे. या प्रभागात मासळी मंडईचा भाग मोडतो. मात्र महिलांसाठी सार्वजनिक शौचालय, स्वच्छतागृह ही मोठी समस्या आहे. सांडपाणी, कचऱ्याची योग्य विल्हेवाट होत नसल्याने प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. त्यामुळे या गंभीर समस्यांवर भर देणे आवश्यक असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
या प्रभागातून ठाकरे शिवसेनेकडून मंदार ओरसकर, काँग्रेसच्या रुपाली सकपाळ, भाजपकडून संतोष शिरगावकर, मरिना फर्नांडिस, शिंदे शिवसेनेकडून राजन परुळेकर, शर्वरी पाटकर या निवडणूक रिंगणात आहेत. यात शर्वरी पाटकर या माजी नगरसेविका राहिल्या आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त सर्व उमेदवार हे नवखे आहेत. मात्र, या उमेदवारांचा आपापल्या भागात मोठा प्रभाव आहे. सामाजिक क्षेत्रात या उमेदवारांचे चांगले काम आहे. त्यामुळे या निवडणुकीत मतदारांचा आपल्यालाच पाठींबा मिळेल असा विश्वास त्यांना वाटत आहे. सर्वच उमेदवारांनी प्रभागात मोठा जोर लावला आहे. त्यामुळे या प्रभागाची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र आहे. यात कोण बाजी मारतो? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Shortage: पोळी, भाकरीलाही इंधनटंचाईचे ‘चटके’; प्रतिनग दोन ते पाच रुपयांनी दरवाढ

Ahilyanagar News: गुरुजींची बढतीसाठी खटपट! अहिल्यानगर जिल्हा परिषदेत एजंटांनी टाकले गळ, नियमातील संदिग्धतेने फावले..

Harish Rana Case: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालेलं? परदेशात विषारी इंजेक्शन टोचतात; पण भारतात इच्छामरण कसं दिलं जातं? कायदा काय सांगतो?

"खरे हिरो बाबाच!" शिवम दुबेने T20 World Cup चे मेडल घातलं वडिलांच्या गळ्यात; पाहा Video

Female Foeticide Law : 7 ते 10 वर्षांची जेल आणि थेट कारवाई! स्त्रीभ्रूण हत्येचा कलंक पुसण्यासाठी सरकारने आखला 'हा' प्लॅन; आरोग्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

SCROLL FOR NEXT