शिंदे गटाविरोधात विरोधकांची एकजूट
मंडणगड तालुका; राष्ट्रवादीला महाविकास आघाडीची साथ
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता.२७ ः राष्ट्रवादी अजित पवार गटाला महाविकास आघाडीतील पक्षांनी साथ दिल्यामुळे उमरोली उपसरपंच निवडणुकीत शिंदे गटाला धक्का मिळाला आहे. त्यामुळे ही निवडणूक महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यातील स्थानिक स्तरावरील आगामी संघर्षाची झलक ठरली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येऊ घातलेल्या निवडणुकांची चाहूल लागताच मंडणगड तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. निवडणुका अजून अवकाशात असल्या तरी गेल्या महिनाभरापासून रंगीत तालीम सुरू झाली असून, पडद्यामागील हालचालींनी राजकीय चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. शिवसेना शिंदे गट एकट्याने मैदानात उतरला तरीही प्रतिस्पर्ध्यांना भारी पडेल, हा अंदाज खोटा ठरवण्यासाठी महाविकास आघाडी व महायुतीतील घटक पक्ष स्थानिक स्तरावर एकत्र येऊ लागले आहेत. शिवसेना शिंदे गटाविरोधात तालुक्यातील बहुतेक पक्ष एकवटत असून, परस्परांमध्ये समन्वयासाठी गुप्त बैठकांना वेग आला आहे. उमरोली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडणुकीत शिंदे गटाकडे पाच सदस्य असूनही त्यांचा उमेदवार पराभूत झाल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली. राष्ट्रवादी (अजित पवार) गट, उबाठा शिवसेना आणि शिंदे गटातील एका मतामुळे समसमान परिस्थिती निर्माण झाली आणि चिठ्ठीद्वारे राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचा उमेदवार विजयी ठरला. या घटनेचा आगामी निवडणुकांवर दूरगामी परिणाम होणार असल्याचे विरोधकांकडून सांगितले जात आहे. महायुतीचा घटक असूनही अजित पवार गट व शिवसेना शिंदे गट यांनी स्थानिक निवडणुकांमध्ये वेगवेगळी भूमिका घेतल्याचे या घडामोडींवरून स्पष्ट झाले आहे.
-----
चौकट
....तर निकालावर प्रभाव !
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सहा जागांसाठी शिंदे गटात प्रचंड इच्छुकांची गर्दी असून, भाजपही किमान एका जागेसाठी आग्रही आहे; मात्र शिंदे गटाकडून जागा मिळण्याची शक्यता कमी आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) गट महाविकास आघाडीत अधिकृतरीत्या सामील झाल्यास मतांची टक्केवारी बदलून निकालावर प्रभाव पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
---
ही बातमी पोटात घ्यावी
Rat२७p३०.jpg
२५O०७०४१
उमरोली: उपसरपंचपदी निवड झालेल्या हसरत खोपटकर यांचे अभिनंदन करताना राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष साधना बोतरे, तालुकाध्यक्ष मुझफ्फर मुकादम व अन्य.
उमरोलीत उपसरपंचपदी खोपटकर
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २७ ः उमरोली ग्रुपग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे हसरत खोपटकर यांची निवड झाली आहे. समसमान मते मिळाल्यामुळे चिठ्ठी टाकून निवड करण्यात आली. त्यात पिठासीन निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवासी नायब तहसीलदार संजय गुरव यांच्या अध्यक्षतेखाली काल (ता. २६) ही निवडणूक पार पडली.
गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना (शिंदे गट) ताब्यात असलेल्या या ग्रामपंचायतीत उपसरपंचपदाची निवड चुरशीची ठरली. पाच सदस्यांसह एकहाती सत्ता असलेल्या शिंदेगटाकडून ज्योती जगताप यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि उबाठा शिवसेना यांनी एकत्र येत हसरत खोपटकर यांना उमेदवार म्हणून उतरवले. मतदार प्रक्रियेत शिंदे गटाचे एकमत फुटल्याने दोन्ही उमेदवारांना चार-चार अशी समसमान मते मिळाली. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी चिठ्ठीद्वारे उपसरपंच निवडण्याची घोषणा केली. चिठ्ठीचा कौल हसरत खोपटकर यांच्या बाजूने लागल्याने त्यांची उपसरपंचपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. निवडीनंतर राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा साधना बोतरे, तालुकाध्यक्ष मुझफ्फर मुकादम, भाई पोस्टुरे, मुश्ताक मिरकर, प्रकाश शिगवण, उबाठा तालुका संघटक जितेंद्र दवंडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष मांढरे, सुभाष सापटे, राकेश साळुंखे, लुकमान चिखलकर यांनी खोपटकर यांचे अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.