कोकण

देवगडात ‘मिळून सारे’तर्फे संविधान दिन

CD

‘मिळून सारे’ समुहातर्फे
देवगडात संविधान दिन

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २९ : येथील ‘मिळून सारे’ समुहातर्फे संविधान दिन साजरा झाला. भारतीय संविधान आणि त्यातील मूलतत्वे या अनुषंगाने प्रमुख वक्ते अंकुश कदम यांनी मार्गदर्शन केले. येथील शेठ म. ग. हायस्कूच्या गुरुदक्षिणा सभागृहात हा कार्यक्रम घेण्‍यात आला.
व्यासपीठावर ‘मिळून सारे’ समुहाचे अध्यक्ष राजेंद्र हिंदळेकर, सचिव संकेत लब्‍दे, कोषाध्‍यक्ष के. एस. कदम, शेठ म. ग. हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रवीण खडपकर, उपनगराध्यक्षा मिताली सावंत, नगरसेविका मनिषा जामसंडेकर, मिलिंद कुबल, विजय जगताप, ‘सकाळ’चे प्रतिनिधी संतोष कुळकर्णी, दयानंद मांगले, विलास रुमडे, पंचायत समिती कृषी अधिकारी दिगंबर खराडे, अभियंता तांबे, दिलीप कदम, अनिल कोरगावकर आदी उपस्थित होते. यावेळी कदम यांच्यासह मांगले यांचा सत्कार करण्यात आला. कदम यांनी भारतीय संविधान आणि आजची राजकीय, सामाजिक स्थिती या अनुषंगाने विचार व्यक्त केले. संविधानातील तरतुदी, त्याची रचना आणि सामान्यांना मिळालेले अधिकार याचा ऊहापोह केला. यावेळी हिंदळेकर, मांगले यांनी मनोगत व्यक्त केले. संकेत लब्‍दे यांनी प्रास्ताविक केले. दिलीप कदम यांनी सूत्रसंचालन केले. विलास रुमडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict : पाकिस्तानचा अफगानिस्तानातील हॉस्पिटलवर हल्ला, ४०० लोकांचा मृत्यू, २५० हून अधिक जखमी झाल्याचा तालिबानचा दावा

इंग्रजी शाळांमध्ये मिळणार मोफत प्रवेश! ‘आरटीई’ प्रवेशासाठी 25 मार्चपर्यंत करता येणार अर्ज, पालकांना घरापासून 5KM अंतरातील निवडता येणार शाळा

Panchang 17 March 2026: आजच्या दिवशी ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण आणि ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा जप करावा

Gulabrao Patil: केंद्राने निधी अडवल्याने ‘जलजीवन’ला खीळ; मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती, २५ हजार ६१ योजनांची कामे ठप्प!

अग्रलेख : बाहुली बोलकी झाली…

SCROLL FOR NEXT