कोकण

बाबा मोंडकर-दत्ता सामंत बातमी

CD

swt2740.jpg
07104
मालवणः येथे भाजपचे शहर मंडल अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी मार्गदर्शन केले. सोबत तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर.

दत्ता सामंत यांच्या विरोधात
निवडणूकीनंतर आवाज उठविणार
बाबा मोंडकर ः षडयंत्र रचणारे राजकारणी असल्याची टिका
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २८ : मी भाजप संघटनेचा कार्यकर्ता आहे आणि संपूर्ण संघटना माझ्यासोबत आहे. नगरपालिका निवडणूक संपल्यानंतर मी शांत बसणार नाही. ज्या सिद्धगडच्या पायथ्याशी शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंतांनी शासनाचे करोडो रुपयांचे नुकसान केले आहे आणि बेनामी ठेकेदारीचा बादशहा बनले आहेत, त्याला मुळासकट उद्ध्वस्त करणे ही मालवणची गरज आहे. यासाठी मी आवाज उठविणार आहे, असे भाजपचे शहर मंडल अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सामंत हे षडयंत्र रचणारे राजकारणी असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
दोन दिवसांपूर्वी श्री. सामंत यांनी बंदर जेटी येथील स्टॉल्स वितरणात मोंडकर यांनी २५ लाख रुपये आपल्या घशात घातल्याचा आरोप केला होता. यावर श्री. मोंडकर यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर उपस्थित होते. सामंत यांनी माझ्यावर टीका केली, ही चांगली गोष्ट झाली. कारण त्या माणगावातून आणि सिद्धगडच्या लोकांनी मला कागदपत्रे पाठवली. ज्या क्रशरच्या जीवावर ते उड्या मारत आहेत मारत आहेत, तो क्रशर मी उध्वस्त करणार असा इशारा मोंडकर यांनी दिला. सिद्धगड परिसरातील लोकांसोबत भाजप ठामपणे उभी राहणार असून हा अनधिकृत धंदा बंद करण्याची जबाबदारी स्वतः मी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सामंत यांच्यावर पक्षांतर्गत कुरघोडीचा गंभीर आरोप करताना मोंडकर म्हणाले, ''सामंताचे जे प्रमुख बगलबच्चे आहेत, ते जिथे जिथे आहेत, तिथे तिथे लोकसभा आणि विधानसभेमध्ये बूथ मायनस झाले आहेत. स्वतःची यंत्रणा उभी करण्याचे त्यांचे स्वप्न भाजपचा कार्यकर्ता म्हणून आम्ही कधीच पूर्ण होऊ देणार नाही. पालिका निवडणुकीनंतर सिद्धगडच्या पायथ्याशी जाऊन सामंत यांचा ''काळा इतिहास'' उघड करणार आणि अनधिकृत क्रशर उध्वस्त करणार. भाजप मालवण शहरवासीयांच्या मनात एक नंबरचा पक्ष म्हणून पुढे येईल आणि अश्वत्थामाचा शेवट करण्यासाठी कार्यकर्ता म्हणून मी पुढे असेन असेही श्री. मोंडकर यांनी स्पष्ट केले.

चौकट
सामंत राजकारणातले अश्वत्थामा
गोवेकर दुकानाच्या खाली, आनंदव्हाळच्या उतारावरील रस्त्याचे काम त्यांना तीनदा सांगूनही झालेले नाही. तुम्ही प्रामाणिकपणे कमवा, पण रस्ता चांगला ठेवा, निदान सरकारचं नाव तरी पॉझिटिव्ह राहील. सामंतांवर ‘खिशातून पैसे काढणे’ हेच काम असल्याचा आरोप करत त्यांना या रस्त्याचे काम करायला जमत नसेल तर त्यासाठी आम्ही पैसे उपलब्ध करून देतो, असे सांगितले. सामंत यांच्यावर टीका करताना मोंडकर यांनी ते राजकारणातले अश्वत्थामा आहेत. ते एवढे पापी आहेत की आयुष्यभर महाभारतानंतर तो जसा जखम घेऊन फिरतोय, तशीच तुमची अवस्था राहणार. फक्त तुमच्या नावात दत्त आहे, पण तुमची कर्म त्या पद्धतीने नाहीयेत. राणे कुटुंबाच्या पाठिंब्याशिवाय ते शून्य आहेत, अशा शब्दांत त्यांनी सामंतांना डिवचले.
-----------------
swt2741.jpg
07105
मालवण ः येथे शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पत्रकार परिषद घेत बाबा मोंडकर यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिले. यावेळी माजी सभापती सुनील घाडीगावकर, संग्राम साळसकर, राजन परुळेकर अन्य पदाधिकारी.

बाबा मोंडकर यांच्या विरोधात
फसवणुकीच्या अनेक केसेस
दत्ता सामंत ः दोन दिवसांत माहिती उघड करणार
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २८ : आमची लढाई भाजपशी नाही किंवा भाजपच्या कोणत्याही नेत्यांशी नाही. आमची लढाई बाबा मोंडकर या प्रवृत्तीच्या विरोधात आहे. मोंडकर यांच्याविरोधात फसवणुकीच्या अनेक केसेस असून दोन दिवसांत त्याची माहिती आणि त्यांचे धनादेश न वटल्याचे पुरावे देणार असल्याचे शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. माझ्यावर एक जरी फसवणुकीची केस सिद्ध झाल्यास, आपण याच क्षणी पदाचा राजीनामा देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.
येथील शिंदे शिवसेनेच्या कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी माजी सभापती सुनील घाडीगावकर, संग्राम साळसकर, राजन परुळेकर अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री. सामंत यांनी मोंडकर यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. मोंडकर यांच्या वैयक्तिक टीकेवर बोलताना, आपण एकेरी भाषा कधीही वापरली नाही आणि वापरणार नाही, असे स्पष्ट केले. तसेच आपल्यावर जनतेचा विश्वास आहे की नाही, हे ठरवण्याचा अधिकार मोंडकर यांना नसून, त्याचे उत्तर जनताच देऊ शकते, असे ते म्हणाले.
समाजकार्य करत राहणे हे आपले काम असून, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आम्हाला ही शिकवण दिली आहे. आपण त्याच प्रेरणेने जनतेची सेवा प्रामाणिकपणे करत आहोत. जनतेची प्रामाणिक सेवा करत असल्यामुळेच मला जिल्हाप्रमुख म्हणून संधी मिळाली आहे," असे त्यांनी सांगितले. आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवक आणि आपण मिळून ३६५ दिवस सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यास कटिबद्ध आहोत, असेही ते म्हणाले.
मोंडकर यांनीच ते पत्र तयार केले असून, पैसे घेतले नाहीत असे नमूद करत लोकांच्या स्वाक्षऱ्या घेण्याची मोहीम चालवली. मात्र, केवळ दोन-तीन लोकांनीच स्वाक्षऱ्या केल्या. पत्रातील अक्षर मोंडकर यांचेच आहे, नसले तर आपण माफी मागू, असेही त्यांनी नमूद केले.
आपला व्यवसाय अधिकृतरित्या सुरू असून बँकांकडून कर्जे घेऊन व्यवसाय करत आहोत. कर्जाची परतफेड नियमित असून आपण प्रामाणिकपणे कर भरत आहोत. सध्या आपण वर्षाला दीड कोटींपेक्षा जास्त कर भरत आहोत. प्रामाणिक काम करणाऱ्यांच्या पाठीशी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस उभे राहून प्रोत्साहन देतात. आपण वर्षाला दोन कोटींपेक्षा जास्त रॉयल्टी भरत आहोत. मोंडकर आपल्याला धमक्या देत असल्याचा आरोपही सामंत यांनी केला. २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून बाबा मोंडकर निवडणूक लढवीत असताना त्यांनी काँग्रेसकडून दहा लाख रुपये घेतले, ही त्यांची फितुरी नाही का?’’कमळ निशाणीवर निवडणूक लढवताना काँग्रेस उमेदवाराकडून पैसे घेणे हे मोठे पाप असून, अशा लोकांवर भाजपने लक्ष ठेवण्याची गरज आहे, असे श्री. सामंत यांनी सांगितले.

चौकट
...तर मी जाहीर माफी मागितली असती
सामंत यांनी स्टॉलधारकांकडून पैसे घेतल्याच्या आरोपावर आपले विधान वैयक्तिक नव्हते, असे स्पष्ट केले. स्टॉलधारकांनी स्वतःहून किती रुपये घेतले गेले, हे सांगितले होते आणि स्टॉलची किंमत तसेच वसूल केलेली रक्कम यावरच आपण भाष्य केले होते. जर आपले विधान खोटे असेल, तर मोंडकर यांनी ५० स्टॉलधारकांना एकत्र आणून आमच्याकडून पैसे घेतले नाहीत असे जाहीर करायला हवे होते. तसे केले असते तर आपण जाहीर माफी मागितली असती. स्टॉलधारकांना समोर न आणता, मोंडकर यांनी केवळ एकतर्फी आरोप केले. याचा निर्णय जनता घेईल, असे सामंत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर 'नंदा देवी' मोठ्या दिमाखात भारतात दाखल! तुमच्या घरातला गॅसचा प्रश्न सुटला...

पत्नी देवीशाचा एक प्रश्न अन् सूर्यकुमार यादवच्या कारकीर्दिला मिळाली कलाटणी; T20 World Cup विजेत्या कर्णधाराने अखेर सिक्रेट सांगितले

Gold Investment: युद्ध सुरू असतानाही सोन्याचे भाव का पडले? शेअर बाजार कोसळला तरी सोनं स्वस्त का? पुढे काय होणार? तज्ज्ञांचे मत

Latest Marathi News Live Update : पिंपरी चिंचवडमधील मुळा नदीच्या पात्रात आढळला महिलेचा मृतदेह

Navi Mumbai: महाराष्ट्रात मोठी ड्रग्ज तस्करी, धागेदोरे पाकिस्तानातून पंजाबमार्गे, ४० आरोपींना अटक; नवी मुंबई पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT