07136
संविधानामुळे नागरिकांचे अस्तित्व
ॲड. संग्राम कासले ः भंडारी हायस्कूलमध्ये प्रबोधन
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २९ : ‘भारतातील नागरिकांचे अस्तित्व हे भारतीय संविधानामुळे आहे. त्यामुळे भारतीय संविधानातील मूलभूत हक्क व कर्तव्य प्रत्येक भारतीय नागरिकाने जाणून घेणे आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन ॲड. संग्राम कासले यांनी येथे केले.
भंडारी हायस्कूल येथे संविधान दिनानिमित्त भंडारी हायस्कूल, समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग व ‘बार्टी’ यांच्यावतीने प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
मुख्याध्यापक हनुमंत तिवले, आर. डी. बनसोडे उपस्थित होते. प्रारंभी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. आर. डी. बनसोडे यांनी प्रास्ताविकात भारतीय संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेची माहिती दिली. ॲड. कासले म्हणाले, ‘भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, शोषणाविरुद्ध दाद मागण्याचा अधिकार, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार असे महत्त्वाचे अधिकार दिले आहेत. याच अधिकारांमुळे भारतीय नागरिकांचे जीवन अतिशय सुसह्य बनले आहे. भारतीय संविधानामध्ये मूलभूत हक्कांबरोबर कर्तव्ये देखील दिली आहेत. या कर्तव्यांचे पालन करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. त्यासाठी शिक्षक व पालकांनी मुलांना संविधानातील मूलभूत हक्क व कर्तव्यांची माहिती करून देणे गरजेचे आहे, जेणेकरून लहानपणापासूनच विद्यार्थ्यांच्या मनात संविधानाविषयी आदर निर्माण होईल.’ यावेळी भंडारी हायस्कूलतर्फे संग्राम कासले यांचा सत्कार करण्यात आला. बनसोडे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.