कोकण

म्हापण खवणेश्वर शाळेचे क्रीडा महोत्सवात यश

CD

07175

म्हापण खवणेश्वर शाळेचे क्रीडा महोत्सवात यश
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. २८ ः विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव, बुद्धिमत्तेला चालना मिळावी या मोठ्या उद्देशाने बाल, कला, क्रीडा महोत्सव आणि ज्ञानी मी होणार यासारखा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये म्हापण खवणेश्वर शाळेने सर्व प्रकारांत उत्तुंग यश मिळविले.
म्हापण केंद्रस्तरीय शालेय बाल, कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव नुकताच संपन्न झाला. यामध्ये वेंगुर्ला तालुक्यातील म्हापण खवणेश्वर शाळेने घवघवीत यश संपादन केले. समूह नृत्य लहान गटात प्रथम, समूह गान स्पर्धेतही शाळा प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. लहान गटात श्रीनंद घाडी, गौरेश घाडीगावकर, अथर्व घाडीगावकर, तर मोठ्या गटात आराध्या घाडी, अन्वी राऊळ, सान्वी घाडी, तेजस्विनी परब, दुर्वा परब, सृष्टी घाडी, भूमी परब, रिद्धी घाडी, हर्षिता गोसावी, स्वरा खोत यांनी सहभाग घेतला. कबड्डी स्पर्धेतही लहान गटात या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला. ५० मीटर धावणे स्पर्धेत श्रीनंद घाडी याने प्रथम, तर मुलींमध्ये अन्वी राऊळ हिने तृतीय क्रमांक पटकावला. १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत आराध्या घाडी हिने प्रथम क्रमांक पटकावला. ५० बाय ४ रिले या स्पर्धेत मुलींमध्ये आराध्या घाडी, अन्वी राऊळ, सान्वी घाडी, तेजस्विनी परब यांनी प्रथम क्रमांक मिळवला. लांब उडीत मुलींमध्ये आराध्या घाडी प्रथम, उंच उडी मुलींमध्ये सान्वी घाडी हिने प्रथम क्रमांक पटकावला. सर्व विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्कृष्ट यश संपादन केल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष असीम राऊळ, उपाध्यक्ष मंजुषा घाडी, मुख्याध्यापक योगेश सकपाळ, उपशिक्षक संतोष गोसावी, शिक्षणतज्ञ भाई घाडी, व्यवस्थापन समिती सदस्य व पालकांच्या वतीने कौतुक करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant: सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देश चालवावा का? सरन्यायाधीशांना कशामुळे राग आला, म्हणाले, "ही याचिका शॉपिंग मॉलसारखी"

Chhatrapati Sambhajinagar Gas Shortage: गॅस टंचाईची भीती; संभाजीनगरमध्ये सिलिंडरसाठी १० दिवसांची वेटिंग; डबल सिलिंडर असलेले ग्राहकही आगाऊ बुकिंगकडे

Pi Day 2026: 'या' कारणामुळे 14 मार्चला साजरा केला जातो 'पाय डे'! जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि काही रंजक गोष्टी

Chhatrapati Sambhajinagar News: गॅससाठी जनतेच्या रांगा, पण पथकांना काळाबाजार दिसतच नाही! छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस गोंधळ

नवीन लॉ कॉलेजच्या मान्यतेसाठी १४ नवे नियम! बार कौन्सिल ऑफ इंडियाचे गॅझेट प्रसिद्ध; इतक्या किलोमीटर अंतराची अट अन्‌ गरज पाहूनच मान्यता, वाचा...

SCROLL FOR NEXT