कोकण

भारतदास महाराजांची आज २६ वी पुण्यतिथी

CD

भारतदास महाराजांची
आज २६ वी पुण्यतिथी
सावंतवाडी ः आंबोली राघवेश्वर मठ येथील सद्गुरू भारतदास महाराजांची २६ वी पुण्यतिथी रविवारी (ता.३०) होत आहे. यानिमित्त उद्या (ता.२९) सायंकाळी सत्यनारायण महापूजा, आरती, वीणापूजन, नामांकितांच्या भजनाचा कार्यक्रम, कीर्तन व प्रवचन होणार आहे. पुण्यतिथी दिवशी म्हणजेच ३० ला पहाटे काकड आरती, सकाळी ९ वाजता अभिषेक, आरती, पालखी सोहळा, नामस्मरण तसेच दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे.
---
कडावलला आज
वार्षिक जत्रोत्सव
कुडाळ ः कडावल (ता.कुडाळ) येथील ग्रामदेवता श्री देव लिंग रवळनाथचा वार्षिक जत्रोत्सव उद्या (ता.२९) होणार आहे. पारंपरिक रूढीनुसार ओट्या भरणे, नवस फेडणे आदी धार्मिक कार्यक्रमांसह रात्री खानोलकर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे. या जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान कमिटी व ग्रामस्थांनी केले आहे.
----------------
न्हावेली येथे
उद्या जत्रोत्सव
सावंतवाडी ः न्हावेलीचे ग्रामदैवत श्री देवी माऊली रवळनाथ पंचायतनचा रविवारी (ता.३०) जत्रोत्सव होणार आहे. यानिमित्त सकाळी धार्मिक विधी त्यानंतर ओटी भरणे, केळी ठेवणे, नवस बोलणे व फेडणे, रात्री उशिरा वालावलकर दशावतार नाट्यमंडळ, ओसरगाव यांचा नाट्यप्रयोग होणार आहे. सर्व भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन देवस्थान कमिटी व मानकरी गावकर मंडळींनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Passed Away: अलविदा दादा ! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आज बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, राज्यात शोकाकूल वातावरण

Ajit Pawar Death: आभार मानायचे राहिले… पुण्यासाठी घेतलेला दादांचा तो निर्णय ठरला अखेरचा

Ajit Pawar Death News LIVE Updates : अजित पवार यांचे पार्थिव काटेवाडीकडे रवाना

ED seizes Anil Ambani assets : अनिल अंबानींविरुद्ध ‘ED’ची मोठी कारवाई! १ हजार ८८५ कोटींच्या मालमत्ता तात्पुरती जप्त

Pune University Exam : मोठी बातमी! पुणे विद्यापीठाच्या गुरुवारी होणारी हिवाळी सत्र परीक्षा पुढे ढकलली

SCROLL FOR NEXT