07213
लक्ष्मीबाई हळबे महाविद्यालयात
महात्मा फुले यांना अभिवादन
दोडामार्ग : येथील लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयात महात्मा फुले यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. सुभाष सावंत, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पी. डी. गाथाडे अंतर्गत गुणवत्ता हमी विभागाचे प्रमुख प्रा. दिलीप बर्वे, अजीवन अध्यायन विभागाचे प्रमुख डॉ. सोपान जाधव होते. सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. गाथाडे यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप बर्वे यांनी आभार मानले.
---------------
07215
वारगाव हायस्कूलमध्ये नेत्र चिकित्सा
तळेरे ः ग्लोबल फाउंडेशन पिंगुळी या सेवाभावी संस्थेतर्फे वारगाव येथील शेठ एम. व्ही. केसरकर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मोफत नेत्र चिकित्सा करण्यात आली. यावेळी ६५ विद्यार्थी आणि ८ कर्मचाऱ्यांची चिकित्सा केली. यावेळी संस्थेचे व्यवस्थापक प्रसाद परब, नेत्र तपासणी तज्ज्ञ श्री. परब, श्री. गावडे यांनी तपासणी केली. या उपक्रमाबद्दल वारगाव विकास मंडळाचे अध्यक्ष विजय केसरकर, मुख्याध्यापक हनुमंत वाळके यांनी आभार मानले.
----
07214
नाद गावठण येथे सोमवारी हरिनाम सप्ताह
तळेरे ः नाद गावठण येथील नवलादेवी मंदिरात १ डिसेंबरला अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. यानिमित्त विधिवत पूजा करण्यात येईल. त्यानंतर तीर्थप्रसाद देण्यात येईल. या सप्ताहाला मुंबई आणि गावचे मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असतात. यावेळी सर्व भाविकांनी वारकरी दिंड्यांसह उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.